कृत्रिम कुंड्यांची ठिकाणे अशी : पिराजी पेठ, भीमनगर - सलवादे चौक, मार्केट यार्ड - राजर्षी शाहू पुतळा, हाळलक्ष्मी मंदिर- गर्दे विहीरनजीक, आझाद रोड - डॉ. राजेंद्र प्रसाद रोड कॉर्नर, शासकीय विश्रामगृह - कडगाव रोड, सरस्वतीनगर, राधा कृष्ण मंदिरसमोरील शहीद चौगुले उद्यान, मगदूम कॉलनी - लायन्स ब्लड बँक, महालक्ष्मी मंदिर - स्टेज समोर, घाळी कॉलनी - तेली यांच्या घरासमोर. भैरी रोड - मारुती मंदिर शेजारी, एस. टी. कॉलनी - ओंकार प्राईड शेजारी, शिवाजी चौक, सिटी बझार, गुजर वसाहत- मारुती मंदिर शेजारी, नाना-नानी पार्क- चर्च रोड, गणेश मंगल कार्यालयासमोरील खुली जागा, अयोध्या पार्क - अयोध्यानगर, एकता तरुण मंडळ - कासार गल्ली, माणिकबाग रिंगरोड, विसर्जन कुंड - नदीवेस.
दरवर्षी नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक आणि पुरोगामी पक्ष-संघटनेचे कार्यकर्ते कुंडाजवळ उभारून गणेश भक्तांना मूर्ती दान करण्याचे आवाहन करतात. त्यामुळे या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो.