शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

सातवीसह नववीचा अभ्यासक्रम बदलणार

By admin | Updated: January 9, 2017 23:29 IST

पुढील वर्षापासून कार्यवाही : २०१८-१९ पासून ३ री, ४ थी व ५ वीची काही पुस्तके बदलणार

भरत शास्त्री -- बाहुबली---आगामी शैक्षणिक वर्षापासून (२०१७-१८) राज्यातील सातवी व नववीची सर्व पुस्तके बदलणार असून, त्याबद्दलची आवश्यक पूर्तता करण्यासाठी राज्य पाठ्यपुस्तक निर्मिर्ती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने वेगाने कार्यवाही सुरू केली आहे. दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून ३ री, ४ थी व ५ वीची काही पुस्तके बदलणार आहेत. तसे आदेश ‘बालभारती’ने दिले आहेत.स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासाचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा आणि विज्ञान व भाषा या विषयांतील बदलत्या परीक्षा पद्धतीशी सांगड घालता यावी, यासाठी आगामी शैक्षणिक वर्षात इयत्ता नववीची पुस्तके बदलण्यात येणार आहेत. पुस्तकांच्या नव्या रचनेत रचनावादावर भर देण्यात आला आहे.राज्य अभ्यासक्रम आराखडा २०१० व प्राथमिक शिक्षण आराखडा २०१२ सुधारित निकषांनुसार या पुस्तकांमध्ये बदल करण्यात येत आहेत.शैक्षणिक वर्ष २०१६-१७ या चालू वर्षात सहावीच्या पुस्तकापर्यंत बदल करण्यात आले होते. मात्र, यंदा इयत्ता सातवी त्याचबरोबर इयत्ता नववीच्या पुस्तकांचा अभ्यासक्रमही बदलण्यात येणार आहे. नववीच्या पुस्तकातील महत्त्वाचा बदल म्हणजे यात स्वातंत्र्योत्तर इतिहासाचा समावेश असणार आहे. तर भाषा विषयाकरिता प्रश्नपत्रिकेऐवजी कृतिपत्रिका तयार करण्यात आली आहे. यामागे विद्यार्थ्यांची भाषिक कौशल्ये विकसित करण्याचा प्रयत्न आहे.सातवी ते दहावी : अभ्यासक्रमात एकसंधता आणण्यावरही भर१ गेल्या काही वर्षांत अनेक इयत्तांची पुस्तके बदलली आहेत. बदललेली पुस्तके शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला योग्य वेळेत मिळत नसल्याबाबत नेहमी पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते. शाळा सुरू होऊनसुद्धा पुस्तके न मिळण्याची परंपरा यंदा तरी खंडित होईल का, हे जूनमध्येच कळेल.२ नव्या रचनेत इयत्ता सातवी ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात एकसंधता आणण्यावरही भर देण्यात आला आहे. आठवीपर्यंतच्या अभ्यासक्रमाची काठिण्यपातळी सामान्य, तर नववी व दहावीची काठिण्यपातळी जास्त असल्याचा आरोप होत होता. यामध्ये सुसूत्रता आणण्याचाही प्रयत्न या रचनेत करण्यात आला आहे. इयत्ता पहिली ते ज्युनिअर कॉलेजस्तरांवरील अभ्यासक्रमांच्या निर्मिर्तीसाठी यापूर्वी दोन संस्थांकडे जबाबदारी विभागून देण्यात आली होती.३ यात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्या परिषदेच्या माध्यमातून अभ्यासक्रम तयार करण्यात येत होता. प्रत्यक्षात निर्मिर्तीचे काम बालभारतीकडून होत होते. आता मात्र इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत निर्मिर्तीसाठी एकाच अभ्यास मंडळाकडे जबाबदारी देण्यात आली आहे.