शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
4
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
6
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
7
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
8
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
9
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
10
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
11
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
12
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
13
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
14
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
15
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
16
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
17
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
18
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
19
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
20
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."

नऊ माजी, दोन विद्यमानांंची अनामत जप्त

By admin | Updated: November 5, 2015 00:45 IST

२८५ उमेदवारांवर नामुष्की : जवळपास पावणे दोन लाख रुपये जप्त

कोल्हापूर : महापालिका निवडणूक यंदा पक्षीय पातळीवरच गाजली असली तरीही या निवडणुकीत ५०६ उमेदवारांपैकी २८५ उमेदवारांना आपली अनामत रक्कम वाचविता आली नाही. विद्यमान नगरसेवक राजू पसारे यांच्यासह विद्यमान उपमहापौर जोत्स्ना पवार-मेढे यांचे पती बाळकृष्ण पवार-मेढे, सुनंदा तुकाराम तेरदाळकर यांनाही कमी मते मिळाल्याने त्यांची तसेच नऊ माजी नगरसेवकांचीही अनामत रक्कम जप्त झाली. महापालिका निवडणूक कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप-ताराराणी आघाडी याशिवाय रासप, शेकाप, हिंदू महासभा, एस फोर ए, आदी छोट्या-मोठ्या पक्ष आघाड्यांनी लढविली. अनेकांनी विरोधाला विरोध म्हणून निवडणूक लढविली होती. तर एखाद्या उमेदवाराची मते विभागणी होऊन दुसऱ्याचा फायदा होण्यासाठीही काहीजण रिंगणात उतरले होते. एकूण वैध मतांच्या एक अष्टमांश मते उमेदवाराने मिळवावी लागतात, त्यापेक्षा कमी मते मिळाल्यास त्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होते. यासाठी खुल्या प्रवर्गासाठी ५००० रुपये, तर राखीव व महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५०० अनामत रक्कम भरावी लागते. निवडणुकीत उमेदवारांकडून जप्त झालेली एकूण अनामत रक्कम पावणेदोन लाख रुपयांपर्यंत जाते.या निवडणुकीत ताराराणी-भाजप महायुतीला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांची छुपी युती झाल्याची चर्चा चांगलीच रंगली. त्यामुळेही अनेक पक्षांच्या उमेदवारांच्या अनामत रकमाही जप्त झाल्या. अनामत जप्त झालेल्या पक्षांच्या उमेदवारांमध्ये शिवसेना ४५, राष्ट्रवादी ३२, काँग्रेस २५, तर ताराराणी-भाजप महायुतीचे ५ उमेदवार व इतर लहान पक्ष व अपक्ष मिळून १७८ उमेदवार अशा एकूण २८५ उमेदवारांना आपली अनामत रक्कम वाचविण्यात अपयश आले. नगरसेविका सुनंदा तेरदाळकर यांनी मतदानापूर्वीच चार दिवसआधी माघार घेतल्याने त्यांना मते कमी मिळाली.अनामत जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये विद्यमान नगरसेविकांच्या तिघा पतिराजांचा समावेश आहे. यामध्ये विद्यमान उपमहापौर जोत्स्ना मेढे-पवार यांचे पती बाळकृष्ण मेढे-पवार, विद्यमान नगरसेविका रेखा पाटील यांचे पती राजेंद्र पाटील, विद्यमान नगरसेविका रोहिणी काटे यांचे पती व माजी नगरसेवक प्रकाश काटे यांचा समावेश आहे. मधुकर काकडे, प्रदीप पोवार, चंद्रकांत साळोखे, धनाजी आमते, संभाजी बसुगडे, पांडुरंग आडसुळे, नंदकुमार गुर्जर, प्रकाश काटे, अशोक भंडारे या माजी नगरसेवकांनाही अनामत रक्कम वाचविण्यात अपयश आले. याशिवाय अनामत रक्कम जप्त झालेल्यांमध्ये ११६ उमेदवारांना ५० पेक्षा कमी मते मिळाली आहेत. तर दहा उमेदवारांना दोन अंकी मतांचा आकडाही पार करता आलेला नाही. (प्रतिनिधी)