शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

नऊ बंधारे पाण्याखाली

By admin | Updated: July 4, 2016 00:29 IST

जिल्ह्यात पावसाचा जोर : गगनबावडा, शाहूवाडी, चंदगड, आजऱ्यात अतिवृष्टी

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून नद्यांची पातळी झपाट्याने वाढत आहे. नऊ बंधारे पाण्याखाली गेले असून, चंदगड तालुक्यात घर व विहिरीची पडझड होऊन सुमारे लाखाचे नुकसान झाले आहे. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १०९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतही चांगला पाऊस सुरू असून गगनबावडा, शाहूवाडी, चंदगड तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. चोवीस तासांत जिल्ह्यात तब्बल ४६९.१७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता पंचगंगा नदीची पातळी २३ फुटांपर्यंत पोहोचली होती. राजाराम बंधाऱ्याशेजारी प्रतिसेकंद १५२३० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम, रुई, सुर्वे, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, शिंगणापूर; तर भोगावती नदीवरील खडक-कोगे, राशिवडे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू आहे. राधानगरी १२०, दूधगंगा ९५, कासारी १५०, कडवी ९२, कुंभी १०७, पाटगाव ९४, घटप्रभा १२५, कोदे १३३ मिलिमीटर अशी पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात चोवीस तासांत ०.३५ टी. एम. सी. म्हणजे १० टक्के वाढ झाली आहे. धरणात सध्या २७ टक्के जलसाठा असून तुळशी २६ टक्के, वारणा २७ टक्के, दूधगंगा १० टक्के, कासारी २४ टक्के, कडवी ४९ टक्के भरले आहे. चंदगड तालुक्यात हजगोळी गावातील विठ्ठल शिंदे यांच्या घराची पडझड होऊन सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. कानडेगाव येथील लक्ष्मण देसाई यांच्या विहिरीचा संरक्षक कठडा कोसळून सुमारे ४९ हजारांचे नुकसान झाले. शाहूवाडीत संततधार पाऊस मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात रविवारी दिवसभर पावसाच्या संततधार सरी कोसळत होत्या. वारणा, कडवी, कासारी, शाळी नद्या भरून वाहू लागल्या आहेत. तालुक्यात ४८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. शिरोळ बंधारा पाण्याखाली शिरोळ : धरणक्षेत्रात पावसाने जोर धरल्याने पंचगंगा नदीपात्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे़ रविवारी शिरोळ बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे शिरोळ-कुरुंदवाड जुना मार्ग बंद झाला आहे़ कुंभी प्रकल्प क्षेत्रात वाढ साळवण : गगनबावडा तालुक्यातील कोदे, अणदूर व कुंभी मध्यम प्रकल्पच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रविवारी ५६ मि.मी. पाऊस झाला. तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये करवीर- २०.३६,कागल- २५.०२, पन्हाळा- ३४.८५, शाहूवाडी- ६४.५०, हातकणंगले- १४.१२, शिरोळ- ८.४२,राधानगरी- ३७.१७, गगनबावडा- १०९, भुदरगड- २७.४०,गडहिंग्लज- १८.४२, आजरा- ४९.७५, चंदगड- ६०.६६. काळम्मावाडी धरणक्षेत्रात पाऊस सोळांकूर : काळम्मावाडी धरण परिक्षेत्रात जून २०१६ अखेर ३८१ मिलिमीटर पाऊस झाला असून, रविवार दिवसअखेर ७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात १.३२ टीएमसी पाणीसाठा आहे. धरण भरण्यासाठी अजून दमदार पावसाची आवश्यकता आहे. गतवर्षी जूनअखेर ७८४ मि.मी. पाऊस झाला होता. गतवर्षी १० टीएमसी पाणी शिल्लक होते. यावर्षी मृतसाठ्यातील पाण्याचा वापर करण्यात आला. दमदार पाऊस झाला तरच आॅगस्टअखेर धरण भरण्याची शक्यता आहे. केर्ले धबधबा पाहण्यास गर्दी मलकापूर : पर्यटकांना भुरळ घालणारा नयनरम्य केर्ले धबधबा कोसळू लागला आहे. मलकापूर-आंबा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे कडवी नदी भरून वाहू लागली आहे. हा धबधबा पाहण्यासाठी जिल्ह्यांतील पर्यटक मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहेत.