शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
3
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल अयशस्वी, तुर्कीचे ड्रोन पाडले"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
4
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
5
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
6
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
7
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
8
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
9
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
10
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
11
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
12
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
13
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
14
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
15
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
16
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
17
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
18
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
19
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
20
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम

निंबाळकर चषक ‘रत्नागिरी’कडे

By admin | Updated: May 25, 2015 00:25 IST

महिला क्रिकेट स्पर्धा : पवार, पसारे यांची चमक

कोल्हापूर : रत्नागिरी जिल्हा महिला संघाने कोल्हापूर जिल्हा महिला संघावर तीन धावांनी मात करीत विक्रमवीर भाऊसाहेब निंबाळकर निमंत्रित आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. सामन्यात रत्नागिरीच्या दर्शना पवारने उत्कृष्ट फलंदाजी केली; तर कोल्हापूरच्या किशोरी पसारेची ७४ धावांची खेळी व्यर्थ ठरली. शिवाजी स्टेडियम येथे रविवारी रत्नागिरी जिल्हा महिला संघ व कोल्हापूर जिल्हा महिला संघ यांच्यात अंतिम लढत झाली. प्रथम फलंदाजी करताना रत्नागिरी संघाने ४० षटकांत ४ बाद १९६ धावा केल्या. यामध्ये अनाम मुकादम ६१, दर्शना पवार ७६, तर श्वेता माने हिने नाबाद १७ धावा केल्या. कोल्हापूर संघाकडून ऋतुजा देशमुख हिने २, तर आदिती गायकवाड हिने एक बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना कोल्हापूर संघाला हे आव्हान पेलविले नाही. कोल्हापूर संघाने ३७ षटकांत सर्वबाद १९३ धावा केल्या. त्याला केवळ तीन धावांनी पराभव पत्करावा लागला. यामध्ये किशोरी पसारे ७४, अनुजा पाटील ३३, तर ऋतुजा देशमुख हिने २२ धावा केल्या. रत्नागिरी संघाकडून श्वेता माने हिने ५, तर भाग्यश्री वासवेने तीन व दीपा ताम्हणकरने दोन बळी घेत कोल्हापूरचा सर्व संघ गारद करीत अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले. स्पर्धेचे बक्षीस वितरण अमरजा निंबाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘केडीसीए’चे अध्यक्ष बाळ पाटणकर, रमेश कदम, रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे दीपक मोरे, प्रदीप साळवी, प्रशिक्षक हरीश लांडे, केदार गयावळ, उपाध्यक्ष चेतन चौगुले, मधुकर बामणे, निसा मुजावर, पंच शिवाजी कामते, भरत माने, आदी उपस्थित होते. विजयी संघदर्शना पवार (कर्णधार), श्वेता माने, अनाम मुकादम, दीपा ताम्हणकर, वर्षा सावंत, भाग्यश्री वासवे, वर्षा ढवळे, प्रणाली सावंत, मंजिरी रेवले, सुचेता पवार, अश्विनी पास्ते, विनया जोशी.