शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

निलेवाडी-ऐतवडे खुर्द पुलाचे कठडे तुटले

By admin | Updated: May 14, 2017 22:42 IST

वाहतुकीला धोका : नेहमी वर्दळ असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

दिलीप चरणे ।  --लोकमत न्यूज नेटवर्कनवे पारगाव : कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या वारणा नदीवरील निलेवाडी-ऐतवडे खुर्द पुलाचे संरक्षक कठडे तुटल्याने धोकादायक बनला आहे. हा पूल दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असल्याने दुरुस्तीची जबाबदारी झटकण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. पुलावरील संरक्षक ग्रील दुरुस्तीसाठी बारा वर्षे वाट पहाणाऱ्या नागरिकांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे. वारणा नदीवरील ऐतवडे खुर्द पुलावरील मार्ग वारणानगर-कोडोली व निलेवाडीहून पारगावला जाणारा जवळचा आहे. वारणा कारखाना, दूध संघाकडे जाणारे कर्मचारी, विद्यार्थी व वारणा-कोडोलीकडे व पारगाव मार्गे पुढे वाठार, वडगाव, कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांना हा मार्ग सोयिस्कर आहे.पुलावरून वाहतुकीची अशा धोकादायक स्थितीतही रात्रंदिवस सतत वर्दळ चालू आहे. प्रत्येक पावसाळ्यात हा पूल महापुराने ७-८ दिवस पाण्याखाली जात असतो. पाण्याच्या प्रवाहामुळे पुलाचे संरक्षक कठडे, याशिवाय दोन्ही बाजूच्या संरक्षक पाईप्स तुटून गेल्याने हा पूल धोकादायक बनला आहे. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. २००५ मध्ये वारणा नदीला महापूर आला होता. यावेळच्या महापुराने या पुलाच्या दोन्ही बाजूकडील संरक्षक पाईप वाहून गेल्या, तर काही गायब झाल्या होत्या. पूल कठडा ग्रील दुरुस्तीसाठी निलेवाडी व ऐतवडे खुर्दच्या ग्रामस्थांनी वारंवार अर्ज-विनंत्या केल्या. ग्रामसभेत ठरावही झाले. तथापि दोन्ही जिल्ह्यांनी एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याचे काम केले आहे.संरक्षक कठड्यांअभावी पूल वाहतूक व प्रवाशांसाठी धोका बनला आहे. या पुलाजवळ मगरीचा वावर असल्यामुळे पुलावरून कोसळल्यावर मगरीपासून सुटका नसल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. संबंधितांकडून सदर पुलाची पावसाळ्यापूर्वी योग्य ती दुरुस्ती करून वाहतूकयोग्य करावा, अशी मागणी येथील स्थानिक ग्रामस्थांसह, नोकर, विद्यार्थी, वाहनचालक व प्रवाशांतून जोर धरत आहे.आजअखेर याठिकाणी पुलावरून अपघातात २ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एक मोटारसायकल नदीत सापडली आहे. त्यामुळे संबंधित विभाग आणखी अशा दुर्दैवी घटना घडण्याची वाट अजून बघणार आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. ऐतवडे खुर्द ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतून या गंभीर विषयावर वारंवार चर्चा झाली आहे. त्यामुळे संबंधितांकडून त्वरीत दखल घेऊन पावसाळ्यापूर्वी या पुलाची योग्य ती दुरुस्ती होऊन हा पुलावरील रस्ता वाहतुकीयोग्य व्हावा, अन्यथा आंदोलन उभारण्याचा इशारा येथील स्थानिक नागरिकांतून दिला आहे.मापे घेतली; कार्यवाही नाहीमहाडच्या दुर्दैवी घटनेनंतर काही दिवसांतच संबंधित विभागाकडून या पुलाची मापे घेतली. पुलावरील निकृष्ट रस्ता व संरक्षक कठडे व गायब झालेल्या पाईपची जुजबी माहिती घेतली. पण त्यानंतर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.