शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदासाठी काँग्रेसकडून नीलोफर आजरेकर, ताराराणीकडून अर्चना पागर यांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 17:06 IST

महापौरपदाच्या निवडणुकीकरिता आज, गुरुवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत काँग्रेस आघाडीतर्फे निलोफर आजरेकर तर ताराराणी आघाडीतर्फे अर्चना पागर यांचे अर्ज दाखल झाले. महानगरपालिकेत सोमवारी (दि. १०) सकाळी ही निवडणूक होणार आहे.

ठळक मुद्देमहापौरपदासाठी काँग्रेसकडून नीलोफर आजरेकरताराराणीकडून अर्चना पागर यांचे अर्ज दाखल

कोल्हापूर : महापौरपदाच्या निवडणुकीकरिता आज, गुरुवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत काँग्रेस आघाडीतर्फे निलोफर आजरेकर तर ताराराणी आघाडीतर्फे अर्चना पागर यांचे अर्ज दाखल झाले. महानगरपालिकेत सोमवारी (दि. १०) सकाळी ही निवडणूक होणार आहे.महापौरपदाचे उमेदवार कोण असणार, कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार, याबाबत उत्कंठा लागून राहिली होती, मात्र दुपारी चारनंतर काँग्रेस आघाडीतर्फे निलोफर आजरेकर तर ताराराणी आघाडीतर्फे अर्चना पागर यांचे अर्ज दाखल झाल्याने सोमवारी सकाळी ११ वाजता ही निवडणूक होणार हे निश्चित झाले आहे.

असे असले तरी महानगरपालिकेतील सत्ताबळ पाहता काँग्रेस आघाडीच्या निलोफर आजरेकर याच नव्या महापौरपद होणार, हे निश्चित झाले आहे. त्यांच्याकडे नऊ महिन्यांचा कार्यकाल असणार आहे.राष्ट्रवादीच्या अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर यांनी राजीनामा दिल्यानंतर नव्या महापौरपदाच्या निवडणुका होत आहे, यामुळे महापालिकेतील राजकारणात चुरस निर्माण झाली आहे. विरोधी आघाडीपेक्षा ही चुरस सत्तारूढ कॉँग्रेस पक्षातच अधिक होती.

दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री सतेज पाटील यांनी कॉँग्रेसच्या नगरसेवकांची मते अजमावून घेतली होती. तरीही त्यातून निर्णयापर्यंत पोहोचता आले नव्हते. त्यामुळे पालकमंत्र्यांनी बुधवारी इच्छुक उमेदवारांशी चर्चा केली.पालकमंत्री पाटील यांनी निलोफर आजरेकर, उमा बनछोडे, दीपा मगदूम, जयश्री चव्हाण या चौघा इच्छुकांबरोबर चर्चा केली. यावेळी इंदुमती माने व राहुल माने हे बाहेरगावी गेल्यामुळे मुलाखतीवेळी अनुपस्थित होते. गुरुवारी गटनेते शारंगधर देशमुख यांच्याकडे निलोफर आजरेकर यांचे नाव महापौरपदासाठी देण्यात आले.दरम्यान, विरोधी भाजप ताराराणी आघाडीनेही बुधवारी बैठक घेतली. विरोधी पक्षपेते विजय सूर्यवंशी, गटनेते सत्यजित कदम, अजित ठाणेकर या तिघांनी बसून चर्चा केली. महापौरपदाची निवडणूक ताराराणी आघाडीने, तर स्थायी सभापतिपदाची निवडणूक भाजपने लढवावी, असे यावेळी ठरले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील व प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांना माहिती देण्यात आली. गुरुवारी दुपारी ताराराणी आघाडीतर्फे अर्चना पागर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाMayorमहापौरkolhapurकोल्हापूर