शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांत नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध होणार  : संजय मंडलिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 14:08 IST

टर्मिनल बिल्ंिडग, एटीसी टॉवर, अतिरिक्त भूसंपादन, आदी स्वरूपातील विमानतळाबाबतची कामे प्रगतिपथावर आहेत. विमान सेवेला गती देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नाईट लँडिंग सुविधेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ही सेवा तीन महिन्यांत उपलब्ध होईल. त्यादृृष्टीने विमानतळ प्राधिकरणाचे काम सुरू आहे, असे खासदार संजय मंडलिक यांनी येथे सांगितले.

ठळक मुद्देतीन महिन्यांत नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध होणार  : संजय मंडलिकविमानतळ सल्लागार समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

कोल्हापूर : टर्मिनल बिल्ंिडग, एटीसी टॉवर, अतिरिक्त भूसंपादन, आदी स्वरूपातील विमानतळाबाबतची कामे प्रगतिपथावर आहेत. विमान सेवेला गती देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नाईट लँडिंग सुविधेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ही सेवा तीन महिन्यांत उपलब्ध होईल. त्यादृृष्टीने विमानतळ प्राधिकरणाचे काम सुरू आहे, असे खासदार संजय मंडलिक यांनी येथे सांगितले.कोल्हापूर विमानतळ सल्लागार समितीच्या पहिल्या बैठकीत ते बोलत होते. विमानतळावर झालेल्या बैठकीस खासदार धैर्यशील माने, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर प्रमुख उपस्थित होते.

दर्जेदार सेवा आणि विकासाच्या दिशेने विमानतळाची वाटचाल सुरू आहे. नाईट लँडिंगसह कार्गोची सेवा उपलब्ध करून देण्यातील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार मंडलिक यांनी सांगितले. या बैठकीत विमानतळ विस्तारीकरण, विकासाचे सुरू असणारे काम, त्यातील अडचणी, विविध प्रश्न, भविष्यातील कामे जाणून घेण्यासाठी बैठक घेतली. विमानतळ सुसज्ज असणे कोल्हापूरची गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासह कोल्हापूरच्या विकासाला गती देण्यासाठी खासदार संभाजीराजे, खासदार मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम म्हणून आम्ही काम करणार आहोत. छत्रपती राजाराम महाराज यांच्या नावाला शोभेल असे विमानतळ करण्याचा आम्हा सर्वांचा प्रयत्न राहणार असल्याचे खासदार माने यांनी सांगितले.बैठकीच्या प्रारंभी संचालक कटारिया यांनी विमानतळावर सुरू असणारी विकास कामे, भविष्यातील नियोजित कामे, तसेच अडचणींची माहिती दिली. यावेळी समिती सदस्य व्ही. बी. पाटील, विज्ञान मुंडे, तेज घाटगे, अमर गांधी, विक्रांतसिंह कदम, विजय घाडगे, अमित हुक्केरीकर, विशाल भार्गव, पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले, आदी उपस्थित होते. दरम्यान, बैठकीनंतर समिती सदस्यांनी विमानतळ परिसरात सुरू असणाऱ्या कामांची पाहणी केली.पाच कोटींची फायर फायटिंग व्हॅन दाखलया विमानतळावर पाच कोटी २१ लाख रुपयांची फायर फायटिंग व्हॅन भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाकडून दाखल झाली आहे. आॅस्ट्रिया येथे तयार झालेली ही व्हॅन अद्ययावत आहे. ही व्हॅन धावताना त्यातून फायर फायटिंग करता येते. त्यात पाणी, फोम आणि ड्राय केमिकल पावडरचा वापर करता येतो. सध्या महापालिकेच्या अग्निशमन दलाचा बंबदेखील विमानतळावर उपलब्ध आहे,असे प्राधिकरणाचे संचालक कटारिया यांनी सांगितले. 

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूर