शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
3
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
4
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
5
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
6
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
7
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
9
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
11
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
12
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
13
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
14
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
15
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
16
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
17
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
18
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
19
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
20
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत

पुढील लक्ष्य ‘महापौर’पद महादेवराव महाडिक : राजाराम साखर कारखान्यावर भाजपा-ताराराणीच्या नगरसेवकांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 1:32 AM

कसबा बावडा : कोल्हापुरात आता रामराज्याची सुरुवात झाली असून, येणारा महापौर आपला असेल, असे उद्गार माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी येथे काढले.

कसबा बावडा : कोल्हापुरात आता रामराज्याची सुरुवात झाली असून, येणारा महापौर आपला असेल, असे उद्गार माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी येथे काढले. छत्रपती राजाराम साखर कारखान्यावर नूतन स्थायी सभापती आशिष ढवळे तसेच भाजपा व ताराराणी आघाडीचे नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते भेटण्यास आल्यानंतर ते बोलत होते. यावेळी महाडिक यांनी ढवळे यांना उचलून आनंद व्यक्त केला. याप्रसंगी आमदार अमल महाडिक उपस्थित होते.

ते म्हणाले, रामराज्यामध्ये कधीही कोणावरही अन्याय, अत्याचार झाला नव्हता. आता सर्वांनी असाच एकोपा ठेवावा व काम करावे. स्थायीनंतर आता पुढील लक्ष्य महापौरपद असून, त्यातही भाजपा-ताराराणीचाच झेंडा फडकविण्यासाठी सर्वांनी आतापासून कामाला लागावे, असेही ते म्हणाले. यावेळी भाजपा-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी कारखान्यावर जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाच्या उधळणीबरोबरच माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या जयघोषाच्या घोषणा देऊन नगरसेवक व कार्यकर्त्यांनी हा परिसर दणाणून सोडला.यावेळी गटनेते सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, शेखर कुसाळे, किरण नकाते, सीमा कदम, रुपाराणी निकम, शशिकांत भालकर, वैभव माने, संतोष गायकवाड, स्वप्निल नाईकनवरे, सुनंदा मोहिते, सविता घोरपडे, गीता गुरव, आदी उपस्थित होते.ढवळे दुसºयांदा सभापतीमहापालिकेच्या आर्थिक नाड्या असलेल्या स्थायी समितीच्या सभापतिपदी एकदा निवड व्हावी, अशी अनेक नगरसेवकांची तीव्र इच्छा असते. अनेकांना प्रयत्न करूनही हे पद मिळत नाही; परंतु आशिष ढवळे यांना आठ वर्षांत दुसºयांदा सभापती होण्याचा मान मिळाला. यापूर्वी सन २०१० मध्ये जनसुराज्य पक्षाच्यावतीने त्यांना प्रथम सभापती होण्याची संधी दिली होती. त्यानंतर सोमवारी ‘भाजपा’कडून संधी मिळाली. ढवळे प्रभाग क्रमांक १६ शिवाजी पार्क येथून निवडून आले आहेत. एक शांत, सुशिक्षित व अभ्यास नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. सन २०१५ मध्ये झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्टÑवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर यांचा त्यांनी पराभव केला होता. शहरातील पाण्याच्या गळतीमुळे होणारे नुकसान, एलईडी बल्बमुळे होणारी बचत याचे अभ्यासपूर्ण विवेचन करून ढवळे यांनी प्रशासनाचे डोळे उघडले होते.सुनीता राऊत यांच्याकडून निषेधशिवाजी पेठेतील माजी महापौर सुनीता राऊत व त्यांचे पती माजी नगरसेवक अजित राऊत यांनी अजिंक्य चव्हाण यांचा निषेध केला आहे. चव्हाण यांची वागणूक लज्जास्पद आहे. मागच्या निवडणुकीत मी त्याग करून त्यांना संधी देत निवडून आणले. आज त्यांनी विरोधी गटास मतदान करून शिवाजी पेठेची बदनामी केली आहे. जनतेचा अपमान केला आहे. त्यांचा आम्ही निषेध करत आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.