शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

शिवाजी विद्यापीठाकडून ३० प्राध्यापकांना पदोन्नतीद्वारे नववर्षाची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 12:19 IST

Shivaji University kolhapur शिवाजी विद्यापीठाने विविध अधिविभागांमधील ३० प्राध्यापकांना सेवांतर्गत प्रगती योजनेअंतर्गत करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम (कॅस) पदोन्नती देत नववर्षाची भेट दिली आहे. त्यामुळे या प्राध्यापकांची चार वर्षांची प्रतीक्षा संपली. त्यांच्या शिक्षण आणि संशोधन कार्याला प्रोत्साहन मिळणार आहे.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठाकडून ३० प्राध्यापकांना पदोन्नतीद्वारे नववर्षाची भेट चार वर्षांची प्रतीक्षा संपली : शिक्षण, संशोधनकार्याला प्रोत्साहन

संतोष मिठारी 

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने विविध अधिविभागांमधील ३० प्राध्यापकांना सेवांतर्गत प्रगती योजनेअंतर्गत करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम (कॅस) पदोन्नती देत नववर्षाची भेट दिली आहे. त्यामुळे या प्राध्यापकांची चार वर्षांची प्रतीक्षा संपली. त्यांच्या शिक्षण आणि संशोधन कार्याला प्रोत्साहन मिळणार आहे.काही तांत्रिक कारणांमुळे या पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण रखडली होती. त्याचा परिणाम या प्राध्यापकांच्या मानसिकतेवर होता होता. ते एकप्रकारे विद्यार्थी आणि विद्यापीठ विकासाला मारक ठरत होते. ते लक्षात घेऊन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या सूचनेनुसार विद्यापीठ प्रशासनाने रखडलेल्या पदोन्नतीची कार्यवाही लवकर पू्र्ण करण्याची कार्यवाही केली. त्यामुळे विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभाग, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट, राज्यशास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागांतील ३० प्राध्यापकांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या पदोन्नतीची पत्रे या प्राध्यापकांना विद्यापीठाकडून नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात दिली जाणार आहेत.नववर्षात पदोन्नतीचे वेळापत्रक ठरविणारदिवाळीपूर्वी कॅसअंतर्गत ३६ प्राध्यापकांना पदोन्नती दिली होती. आता नववर्षाच्या पहिल्या दिवशी ३० जणांना दिली जाणार असल्याचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी सांगितले. सर्व पात्र प्राध्यापकांना त्यांच्या करिअरच्या दृष्टीने पदोन्नती वेळेवर मिळणे आवश्यक आहे.

पदोन्नतीमुळे काम करण्यातील हुरूप वाढतो. ज्या-त्या वर्षी पदोन्नती मिळणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या पदोन्नतीचे वेळापत्रक नववर्षात विद्यापीठ प्रशासनाकडून ठरविण्यात येईल. त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले.पदोन्नतीची प्रक्रियासाहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्त झाल्यानंतर त्यांना पुढे सहयोगी प्राध्यापक, वरिष्ठ प्राध्यापक अशी पदोन्नती ह्यकॅसह्णअंतर्गत दिली जाते. त्यासाठीची शैक्षणिक पात्रता, अर्हता पूर्ण केलेल्या प्राध्यापकांनी विद्यापीठ प्रशासनाकडे अर्ज करणे आवश्यक असते. अर्ज केल्यानंतर प्रशासनाकडून त्याची छाननी केली जाते. त्यानंतर काही प्रकरणांमध्ये कागदपत्रांची पडताळणी करून, काही प्रकरणांमध्ये मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण करून पदोन्नती देण्याची कार्यवाही होते.आकडेवारी दृष्टिक्षेपात

  • प्राध्यापकांची मंजूर पदे : २६२
  • कार्यरत पदे : १३९
  • रिक्त पदे : १३०
टॅग्स :Professorप्राध्यापकShivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर