शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

चित्रनगरीत नवी लोकेशन्स होणार

By admin | Updated: February 16, 2016 00:53 IST

सात कोटींचा निधी मंजूर : डिसेंबरपर्यंत कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

विश्वास पाटील-- कोल्हापूर चित्रनगरीचा चेहरामोहरा बदलू शकेल, अशी कामे कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाने हाती घेतली आहेत. तिथे नव्याने सुमारे १२ ते १४ लोकेशन्स तयार करण्यात येत आहेत. त्यासाठी सात कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. या कामांसाठी महामंडळाने आॅनलाईन निविदा मागवल्या आहेत. निविदेची प्रक्रिया पूर्ण करून डिसेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.पायाभूत सुविधांच्या कामासाठी सात कोटींचा निधी उपलब्ध झाला असला तरी ही चित्रनगरी पूर्ण क्षमतेने सुरू केव्हा होणार, याचीच प्रतीक्षा चित्रपट व्यवसायास गेल्या अनेक वर्षांपासून आहे. जुजबी कामे होतात. परंतु, त्यातून चित्रीकरणास मात्र वेग येत नसल्याचा अनुभव आहे. आता हा अनुभव पुसून नवे काही घडण्याची शक्यता तयार झाली आहे. सध्याच्या चित्रनगरीच्या परिसरात चित्रीकरणासाठी आवश्यक सोयी-सुविधांची वानवा आहे. १९८५ ला बांधलेला पाटलांचा वाडा आहे. परंतु, आता त्यावेळेचा पाटील, तमाशा, लावणी आणि घुंगरू हे मराठी चित्रपटांतून हद्दपार झाले आहे. या चित्रपटांनी आता नवे वळण घेतले आहे. त्यामुळे त्यासाठी आवश्यक लोकेशन्स तिथे उभी करण्याचा प्रयत्न आहे. पाटलाचा वाडा कायम ठेवून त्याचे अंतर्बाह्य रूप बदलण्यात येणार आहे. हा वाडा दुमजली करण्यात येणार आहे. पहिल्या मजल्यावर चार लोकेशन्स तयार करण्यात येणार आहेत. कुठूनही कॅमेरा लावला तर वेगळे लोकेशन्स दिसू शकेल. दुसऱ्या मजल्यावर महामंडळाचे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. परंतु, ज्यादिवशी मागणी असेल, तेव्हा हे कार्यालयही चित्रीकरणासाठी भाड्याने दिले जाईल. रस्ता, पोलीस ठाणे, कोर्ट, गेट, सुरक्षा चौकीपासून स्वच्छतागृहांपर्यंतची व्यवस्था करण्यात येणार आहे. या इमारतींना कार्पोरेट लूक देण्याचा प्रयत्न आहे.कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाचे कार्यकारी संचालक संजय पाटील म्हणाले, ‘आॅनलाईन निविदा मागवल्या आहेत. त्यासाठी येत्या शनिवारी (दि. २०) प्री-बीड बैठक होत आहे. २६ फेब्रुवारीपर्यंत निविदा दाखल करण्याची मुदत असली तरी एप्रिलपासून प्रत्यक्षात काम सुरू करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. ही कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण व्हावीत, असे टार्गेट घेऊन आम्ही ही कामे करणार आहोत. कोल्हापूरच्या चित्रनगरीत चित्रीकरणाच्या जास्तीत जास्त चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, असाच आमचा प्रयत्न आहे.’अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर म्हणाले, ‘निधी मंजूर होतो, त्यातून जुजबी कामे होतात. परंतु, चित्रनगरी पूर्ण क्षमतेने चालू झालेली नाही. ती चालू होणार असे आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून नुसतेच ऐकत आहोत. परंतु, प्रत्यक्षात छोट्या-छोट्या पायाभूत सुविधांचीच वानवा आहे. त्याची तातडीने पूर्तता व्हावी. आजही आम्ही त्यासाठीच बैठक घेतली आहे. चित्रनगरी व चित्रपट महामंडळ यांच्यात समन्वयक असलेले संतोष लेले या बैठकीस उपस्थित आहेत.’चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर म्हणाले, ‘चित्रनगरीमध्ये लवकरात लवकर चित्रीकरण सुरू होणे हीच आमची सर्वांत प्रमुख मागणी आहे. आता निर्मात्याला पिण्याच्या पाण्यापासून सगळ्या वस्तू तिथे घेऊन जाऊन चित्रीकरण करावे लागते. आवश्यक त्या सुधारणा लवकरात लवकर करून चित्रीकरण सुरू व्हावे. येत्या १९ फेब्रुवारीस प्रदर्शित होणाऱ्या ‘मि. अँड मिसेस सदाचारी’ चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण कोल्हापूरच्याच चित्रनगरीत झाले आहे.