हाकणंगले पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक म्हणून के. एन. पाटील रुजू झाले आहेत. पोलीस ठाण्याकडे सहा महिन्यांत दोन प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक यांनी काम केले आहे. प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक साहिल झरकार यांच्याकडून पाटील यांनी पदभार स्वीकारला. पोलीस ठाण्यांच्या हद्दीत स्थानिक पोलिसांपेक्षा एलसीबी, डीवायएसपी, अप्पर पो. अधीक्षक यांच्या पथकांनी जुगार, गावठी हातभट्टी दारू, मटका, गुटखा, पानमसाला, लॉजिंगमध्ये सुरू असलेले वैश्या अड्डे अशा बेकायदेशीर व्यवसायावर छापे टाकून कारवाई केली. पोलीस कर्मचाऱ्यांचे व्यावसायिकांशी असलेेले लागेेबाधे उघड झाल्याने पोलीस अधीक्षकांनी त्यांच्यावर बदलीची कारवाई केल्याने हातकणंंगले पोलिसांची नाचक्की झाली होती. अशा पार्श्वभूमीवर नूतन पोलीस निरीक्षकांसमोर प्रशासनाला शिस्त लावण्याचे मोठे आव्हान आहे.
प्रशिक्षणार्थी उपअधीक्षकांकडून नूतन पोलीस निरीक्षकांनी स्वीकारला पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:18 IST