शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीच्या दुसऱ्या फेरीत नव्याने अर्ज करता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 18:01 IST

  Coronavirus Unlock, Education Sector , College, Admisson, Kolhapur कोल्हापूर शहरातील विविध ३४ कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने गुरुवारी जाहीर केले. ही फेरी सोमवार (दि. १४) पासून सुरू होईल. त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नव्याने अर्ज करता येणार आहे.

ठळक मुद्देअकरावीच्या दुसऱ्या फेरीत नव्याने अर्ज करता येणारवेळापत्रक जाहीर : सोमवारपासून प्रक्रिया सुरू

 कोल्हापूर : शहरातील विविध ३४ कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने गुरुवारी जाहीर केले. ही फेरी सोमवार (दि. १४) पासून सुरू होईल. त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नव्याने अर्ज करता येणार आहे.

या समितीची बैठक यशवंतराव चव्हाण कॉलेज (केएमसी)मध्ये झाली. त्यातील निर्णयानंतर दुपारी दोनच्या सुमारास वेळापत्रक जाहीर झाले. पहिल्या फेरीची प्रक्रिया बुधवारी संपली.त्यामध्ये ५८३५ जणांनी प्रवेश निश्चित केले.

समितीकडे अर्ज केलेले अद्याप ६८५६ विद्यार्थी हे प्रवेशित शिल्लक आहेत. या जागांसाठी दुसऱ्या फेरीत प्रक्रिया राबविली जाणार आहे. पहिल्या फेरीमध्ये कोणतेही महाविद्यालय अलॉट झाले नाही, अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत निश्चितपणे प्रवेश मिळणार आहे.

या बैठकीस समितीचे सचिव सुभाष चौगुले, कार्याध्यक्ष प्रशांत नागावकर, एस. एस. चव्हाण, टी. के. सरगर, रवींद्र पोर्लेकर, राजेंद्र हिरकुडे उपस्थित होते. दरम्यान, दुसरी फेरी ही अंतिम फेरी असेल. त्याद्वारे अलॉट झालेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणे विद्यार्थ्यांना बंधनकारक आहे. त्यानंतर कोणताही प्रवेश केंद्रीय समितीकडून केला जाणार नसल्याचे चौगुले यांनी सांगितले.दुसऱ्या फेरीत काय करता येईल?१) ज्या विद्यार्थ्यांना अर्जामध्ये बदल करावयाचा आहे, त्यांनी आपला पूर्वीचा अर्ज संकेतस्थळावर लॉगिन करून रद्द करावा. नवीन अर्ज प्रक्रिया शुल्कासह भरावा.२) ज्या विद्यार्थ्यानी अद्यापही रजिस्टर भाग एक, दोन भरलेला नाही. त्यांना नव्याने ऑनलाईन अर्जा करता येईल.३) ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये महाविद्यालय अलॉट होऊन त्यांनी प्रवेश निश्चित केलेला नाही, अर्जाच्या भाग दोनमध्ये कोणताही बदल करणार नाहीत, त्यांची नावे दुसऱ्या फेरीमध्ये ऑटो शिफ्ट होतील.दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक

  • अर्ज करणे : १४ ते १६ डिसेंबर
  • अर्जांची छाननी : १७ ते १९ डिसेंबर
  • निवड यादीची प्रसिद्धी : २१ डिसेंबर
  • प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही : २१ ते २३ डिसेंबर

आकडेवारी दृष्टिक्षेपात

  • एकूण प्रवेश क्षमता : १४६८०
  • दाखल अर्ज : १२६९१
  • पहिल्या फेरीत झालेले प्रवेश : ५८३५
  • प्रवेशित शिल्लक विद्यार्थी : ६८५६
टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकcollegeमहाविद्यालयEducation Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर