कला, वाणिज्य, विज्ञान, सामाजिकशास्त्रे (पदवी अभ्यासक्रम), पदव्युत्तर अभ्यासक्रम (विद्यापीठ व महाविद्यालयीन) प्रथम, द्वीतीय वर्ष, कला व ललितकला, वाणिज्य व व्यवस्थापन (बी. आय. डी., बी. डेस., बी. बी.ए., बी.सी.ए.) पदवी अभ्यासक्रम, व्यवस्थापन (एम. बी. ए., एम. सी. ए., पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रथम आणि द्वीतीय वर्ष), समाजकार्य (पदवी अभ्यासक्रम प्रथम आणि द्वीतीय वर्ष), शिक्षणशास्त्र, विधी, अभियांत्रिकी, टेक्स्टाईल, वास्तुशास्त्र, फार्मसी, आंतरविद्याशाखीय आणि अभ्यास केंद्राअंतर्गत अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्राची सुरुवात दि. १ ऑक्टोबर, तर काही अभ्यासक्रमाच्या सत्राची समाप्ती जानेवारी २०२२ आणि काहींची फेब्रुवारीमध्ये होणार आहे. द्वीतीय सत्राचा प्रारंभ मार्च २०२२ मध्ये, तर जूनमध्ये सत्र समाप्ती होईल, अशी माहिती कुलसचिव डॉ. व्ही. डी. नांदवडेकर यांनी मंगळवारी दिली. दरम्यान, विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने विविध २९ अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल मंगळवारी ऑनलाईन जाहीर केले. त्यात एम. ए. योगाशास्त्र, बी. व्होक. ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन ॲटोमोबाईल, ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन प्रिंटिंग अँड पब्लिशिंग, बी. ए.- ड्रेस मेकिंग अँड फॅशन कोऑर्डिनेशन, पी. जी. डिप्लोमा इन न्यूट्रिटेशन अँड डाएटस, बी. एस. डब्ल्यू., एल. एल. बी. थ्री ईअर लॉ पॅटर्न, एम. एस्सी. ॲप्लाईड केमिस्ट्री, अल्कोहोल टेक्नॉलॉजी, बी. डेस, पी. जी. डिप्लोमा इन म्युझिऑलॉजी, ट्रान्स्लेशन, बी. कॉम., बँक मॅनेजमेंट, प्री-लॉ फाईव्ह ईयर लॉ पॅटर्न, एम. एस्सी. इंडस्ट्रीअल केमिस्ट्री या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
विद्यापीठाच्या नव्या शैक्षणिक वर्षाचा एक ऑक्टोबरपासून प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:31 IST