येथील तुकाराम कोलेकर महाविद्यालयाच्या पुढाकाराने झालेल्या शिबिरात रक्तसंकलनासाठी गडहिंग्लज लायन्स ब्लड बँकेने सहकार्य केले.
प्रारंभी छ.शिवाजी महाराज आणि शहीद मेजर सत्यजित शिंदे यांच्या पुतळ्याला उपसरपंच अमर हिडदुगी व पंचायत समिती सदस्य विद्याधर गुरबे यांच्याहस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर 'लोकमत'चे संस्थापक स्व.जवाहरलालजी दर्डा तथा बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. संभाजी भांबर व पोलीस उपनिरीक्षक अविनाश माने यांच्याहस्ते करून रक्तदानाला सुरुवात झाली. यावेळी 'लोकमत'चे गडहिंग्लज विभागीय कार्यालय प्रमुख राम मगदूम,वितरण अधिकारी धनाजी पाटील व संग्राम पायमल, लायन्स ब्लड बँकचे जनसंपर्क अधिकारी राजू कुंभार,ग्रामविकास अधिकारी पी.बी पाटील, बुगडीकट्टीचे सरपंच दयानंद देसाई, शिवाजी हिडदुगी,भिकाजी दळवी, वसंत पाटील, प्रकाश दळवी, काशिनाथ शिंत्रे, संगाप्पा साखरे, लक्ष्मण सुतार,राजू सावंत, एस. एन. देसाई,प्रकाश देसाई,
जोतिबा हुबळे आदी उपस्थित होते.
शिबिरासाठी प्रा. सदाशिव चौगुले, आप्पासाहेब कुंभार,
बापूसाहेब गव्हाळे, अमोल बागडी, अभिजित कुंभार, गुलाबराव पाटील, सौरभ हिडदुगी, हर्षवर्धन हिडदुगी, सर्वेश गुंजाटे, सुनील कोळी आदींसह सामाजिक कार्य समिती आणि विविध तरुण मंडळांनी विशेष सहकार्य केले.
'लोकमत'चे उपव्यवस्थापक वितरण (साऊथ)चे संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. नेसरीचे बातमीदार रवींद्र हिडदुगी यांनी स्वागत केले. वितरण अधिकारी अवधूत पोळ यांनी आभार मानले.
फोटो ओळी -
नेसरी ( ता. गडहिंग्लज )
येथे 'लोकमत'तर्फे आयोजित शिबिरात ओंकार पाटील याने सर्व प्रथम व पहिल्यांदाच रक्तदान केले.
.यावेळी उपसरपंच अमर हिडदुगी, पंचायत समिती सदस्य विद्याधर गुरबे,प्राचार्य डॉ. संभाजी भांबर,पोलीस उपनिरीक्षक अविनाश माने,'लोकमत'चे उपसरव्यवस्थापक(वितरण) संजय पाटील, गडहिंग्लज विभागीय कार्यालय प्रमुख राम मगदूम,नेसरीचे बातमीदार रवींद्र हिडदुगी,आदी उपस्थित होते.