शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
6
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
7
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
8
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
9
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
10
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
11
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
12
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
13
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
14
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
15
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
16
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
17
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
18
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
19
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
20
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना

नेपाळमधील गलाई बांधव गोरखपुरात

By admin | Updated: April 28, 2015 23:44 IST

गुरुवारी पोहोचणार स्वगृही : स्वतंत्र बसने प्रवास; आणखी दोन बसेस रवाना

विटा : भूकंपाने हादरून गेलेल्या नेपाळच्या काठमांडू शहरातून सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी तालुक्यातील सुमारे २२ गलाई बांधव कुटुंबियांसह स्वतंत्र बसने भारतातील गोरखपूर येथे मंगळवारी दुपारी सुखरूप दाखल झाले. दरम्यान, काठमांडू शहरातील उर्वरित अन्य ८० ते ९० गलाई बांधव कुटुंबियांसह दुसऱ्या दोन स्वतंत्र बसने गोरखपूरकडे येण्यास रवाना झाले आहेत. या प्रलयंकारी भूकंपाने हाहाकार उडाला असला तरी, मराठी गलाई बांधव सुखरूप असल्याचा निरोप गावाकडील नातेवाईकांना मिळाल्यानंतर त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गुरुवारी हे सर्व गलाई बांधव स्वगृही दाखल होणार आहेत.नेपाळ येथील काठमांडू शहरात सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील सोने-चांदी गलाई बांधव वास्तव्यास आहेत. शनिवारी झालेल्या भूकंपाने काठमांडू शहर हादरून गेल्याचे समजताच त्यांच्या गावाकडील नातेवाईकांत चिंतेचे वातावरण पसरले होते. दूरध्वनीवरून कोणताही संपर्क होत नसल्याने हे नातेवाईक हवालदिल झाले होते. सोमवारी आटपाडी तालुक्यातील य. पा. वाडीचे पोपट चव्हाण यांच्यासह अन्य गलाई बांधवांनी आपापल्या नातेवाईकांशी संपर्क साधून सुखरूप असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांच्या येथील नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.आटपाडी तालुक्यातील य. पा. वाडी येथील पोपट चव्हाण, दीपक खंडागळे, सुहास फडतरे, करण चव्हाण, नारायण चव्हाण, आवळाईचे नवनाथ साळुंखे, अमोल साळुंखे, आटपाडीचे गणेश पाटील, नंदकुमार मरगळ, हर्षवर्धन पवार, तांदळवाडीचे गणेश सावंत, तडवळेचे तात्यासाहेब गिड्डे आदी गलाई बांधवांसह २२ जण स्वतंत्र बसने सोमवारी काठमांडूहून गोरखपूर येथे दाखल झाले. मंगळवारी सायंकाळी चार वाजता खुशीनगर एक्स्प्रेसने हे सर्वजण मुंबईकडे रवाना झाले असून, गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ते स्वगृही दाखल होणार आहेत. (वार्ताहर)आणखी ८0 ते ९0 गलाई बांधव येणारदरम्यान, काठमांडू शहरातील खानापूर तालुक्यातील वाळूजचे दीपक बाबर, कृष्णत बागल, संजय बागल, पळशीचे सचिन जाधव, करंजेचे पोपट मदने, साळशिंगेचे संभाजी जाधव, अकलूजचे शंकर शेळके, निमसोड (खटाव) चे हणमंत चव्हाण, बाळासाहेब पवार, आवळाईचे दशरथ जाधव, मुकुंदराव साळुंखे यांच्यासह सुमारे ८० ते ९० गलाई बांधव दोन स्वतंत्र बसने गोरखपूरकडे येण्यास रवाना झाले असून, भूकंपाने नेपाळमधील नारायण घाटच्या डोंगराच्या कडा कोसळल्याने प्रवासास व्यत्यय आला आहे. या कोसळलेल्या कडा बाजूला करून रस्ता खुला करण्याचे काम युध्दीपातळीवर सुरू असून, येत्या दोन तासात हे सर्व गलाई बांधव नेपाळ-भारत सीमेवर पोहोचतील, अशी माहिती पोपट चव्हाण यांनी ‘लोकमत’शी दूरध्वनीवरून बोलताना दिली.