शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्लक्षित ‘चंदगड’चा विकास साधणार

By admin | Updated: November 26, 2014 00:45 IST

‘दौलत’ सुरू करण्यासाठी प्रयत्न : ‘एव्हीएच’ हटविणार, मूलभूत प्रश्न मार्गी लावणार, पर्यटन वाढीसाठी प्रयत्न

राम मगदूम - गडहिंग्लज -चंदगड विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच स्व. बाबासाहेब कुपेकरांचा एका ओळीचा जाहीरनामा होता. त्यांच्या जाहीरनाम्याची पूर्तता करण्याची जबाबदारी नियतीने माझ्यावर टाकली आहे. निसर्गसंपन्न असूनही दुर्लक्षित राहिलेल्या ‘चंदगड’चा नियोजनबद्ध विकास करणे हेच माझे ध्येय आहे. स्व. कुपेकरांचे सर्वपक्षीय नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे आता सत्तेत नसलो, तरी विकासात कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास आमदार संध्यादेवी कुपेकरांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. १५ वर्षे कुपेकरांनी गडहिंग्लज मतदारसंघाचे यशस्वी नेतृत्व केले. त्यावेळी त्यांनी जवळच्या आजरा व चंदगड तालुक्यांच्या विकासासाठीदेखील जाणीवपूर्वक प्रयत्न केले. ‘आजरा व चंदगड’च्या नळपाणी योजनांसह रेंगाळलेले चित्री व फाटकवाडी हे दोन्ही पाणी प्रकल्प पूर्ण केले. उचंगी, सर्फनाला व झांबरे या प्रकल्पांची सुरुवातही त्यांनीच केली. काही अडचणींमुळे रखडलेले हे तिन्ही प्रकल्प पूर्ण होतील.दौलत साखर कारखाना सलग चौथ्या वर्षी अजूनही बंद असल्यामुळे शेतकरी व कामगारांची मोठी कोंडी झाली आहे. हा कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. हलकर्णी ‘एमआयडीसी’त आलेला विनाशकारी एव्हीएच प्रकल्प स्थलांतरित करावा, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. ‘एव्हीएच’ गेल्यानंतर हलकर्णी औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिक उद्योग-व्यवसायांना चालना देणारे रोजगाराभिमुख प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न राहतील.हत्ती व रानगव्यांच्या उपद्रवामुळे आजरा व चंदगड तालुक्यांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पंचनामे होऊन भरपाई मिळवून देण्याबरोबरच जंगली प्राण्यांकडून मनुष्यहानी होऊ नये, अशी उपाययोजना वनखात्याने करावी यासाठीही प्रयत्नशील आहे.सामानगड, पारगड, गंधर्वगड, कलानंदीगड या ऐतिहासिक किल्ल्यांसह सरसेनापती प्रतापराव गुर्जरांचे स्मारक या पर्यटनस्थळांचा सर्वांगीण विकास, संवर्धन व पर्यटनवाढीसाठी प्रयत्नशील आहे. हॉटेल व्यवसायात बाहेरगावी मजुरी करणाऱ्या स्थानिक तरुणांनी आपल्या तालुक्यात स्वत:चे हॉटेल आणि पर्यटनपूरक व्यवसाय सुरू करावा. कृषी पर्यटनालाही या ठिकाणी मोठा वाव आहे, त्यातूनही रोजगार निर्मिती होईल.देशातील एक नंबरचा काजू चंदगडमध्ये पिकतो. गुजरात, राजस्थान या राज्यांत मोठी मागणी असणारी रताळी येथे मोठ्या प्रमाणात पिकतात. मात्र, त्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प नसल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाही. काजू बोंडावर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू व्हावा आणि काजू व भाताला हमीभाव मिळावा यासाठी प्रयत्नशील आहे.अंतर्गत रस्ते, पाणी, शाळा-इमारती, मैदाने, आरोग्य सुविधा, स्मशानशेड ही मूलभूत कामे मार्गी लावणे हे आपले कर्तव्यच आहे. त्याचबरोबर दळणवळणाची उत्तम सोय करून चंदगड मतदारसंघाच्या विकासाला गती देण्यात कुठेही कमी पडणार नाही.होय, हे करणार !तीन वर्षे बंद पडलेला दौलत साखर कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करणारविनाशकारी एव्हीएच प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत हटवणारकाजू बोंड व रताळ्यावर प्रक्रिया उद्योगासाठी प्रयत्न करणार‘काजू’ व भाताला हमीभाव मिळण्यासाठी प्रयत्न करणारचंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यांतील पर्यटनस्थळांच्या विकासाबरोबरच पर्यटनवाढीसाठी प्रयत्न करणार.बेरोजगारीचा प्रश्न संपविण्यासाठी रोजगाराभिमुख प्रकल्प आणि पर्यटनातून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणारजंगली हत्तीसह हिंस्त्र श्वापदांपासून शेतकऱ्यांना संरक्षण व नुकसानभरपाईसाठी प्रयत्न करणार.आमदार संध्यादेवी कुपेकरमाझा अजेंडा...!