शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ग्रामविकास, कारवाईचा फार्स: दोषींना कामकाज सहभागास मनाई हवी

By समीर देशपांडे | Updated: February 6, 2025 20:06 IST

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पातळीवर निर्णय व्हावेत

समीर देशपांडेकोल्हापूर : सरपंच आणि ग्रामसेवकांनी मिळून संगनमताने बोगस कारभार करायचा. मिळतील तसे पैसे हाणायचे. मग तक्रारी होणार. त्याचे मोघमात अहवाल जाणार. मग सुनावणीच्या तारखांवर तारखा पडणार. मग विभागीय आयुक्त, ग्रामविकास मंत्री आणि उच्च न्यायालय असा प्रवास होऊन निर्णय होणार. तोपर्यंत सरपंचांची मुदत संपलेली असते. ते घरात बसलेले असतात. चौकशी थांबलेली असते. तक्रारदाराचाही हुरूप संपलेला असतो. त्यामुळे ज्या क्षणी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य किंवा ग्रामसेवक दोषी आढळतो त्या क्षणापासून त्याला कामकाजात सहभागी होण्यास बंदी घालण्याची कायद्यात सुधारणा होण्याची गरज आहे.

आता एकीकडे सरपंच, उपसरपंच, सदस्य दोषी असल्याचा अहवाल जरी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पाठवला तरीही जोपर्यंत अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत त्यांना कामकाजात सहभाग घेण्यापासून म्हणजेच बोगस कारभार करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. मग आपल्याला पाहिजे तसे ठराव करून घेण्यासाठी, ठराविकांना कंत्राट देण्यासाठी वाट्टेल ते करण्यास पुढे पाहत नाहीत. गावात विरोधक सक्षम असतील तर याला विरोध होताे. अन्यथा सरपंचाच्या सहीचेच अनेक दाखले पाहिजे असतात. कोणीही तक्रारींच्या भानगडीत पडत नाही आणि बोगस कारभार मागील पानावरून पुढे सुरू राहतो. त्यामुळे त्याक्षणी संबंधित दोषी लोकप्रतिनिधीला कामकाजात सहभागी होता येणार नाही, असा बदल करण्याची गरज आहे.ग्रामसेवकांच्या बाबतीत हेच आहे. आजही एका ग्रामपंचायतीमध्ये गैरकारभार करून दुसऱ्या ग्रामपंचायतीत तोच कित्ता गिरवणारे अनेक ग्रामसेवक राज्यभर आहेत. त्यांचीही चौकशी मोठ्या कालावधीसाठी सुरू राहते. तक्रारदाराला ‘मॅनेज’ करण्यापासून अनेक बाबी यात होतात आणि मूळ दोषी, मूळ दुखणे, झालेला अपहार तसाच राहतो. यातल्या एखाद्या दोषीचे निधन झाले तर मग विषयच संपला.

ग्रा. पं. कायद्यात सुधारणा हवीएकीकडे वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा होत असताना, जलजीवनच्या कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविल्या जात असताना ग्रामपंचायतीकडे मात्र ज्याला अभियांत्रिकीचे, रस्ते बांधकामाचे, अर्थसाक्षरतेची संपूर्ण माहिती असू शकत नाही अशा ग्रामसेवक बंधू-भगिनींच्या खांद्यावर सर्व जबाबदारी टाकली जाते. आता ग्रामपंचायतीही तालुक्याच्या शहरासारख्या मोठ्या झाल्या आहेत. लोकसंख्या वाढली आहे, निधी वाढला, त्या तुलनेत मनुष्यबळ आणि तेही तांत्रिक वाढवण्याची गरज आहे. बदलत्या परिस्थितीत एकूणच ग्रामपंचायतीच्या कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतGovernmentसरकार