शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काब्रा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
4
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
5
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
6
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
7
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
8
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
9
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
10
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
11
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
12
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
13
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
14
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
15
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
16
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
17
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
18
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
19
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
20
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)

भगवान महावीरांच्या तत्त्वांची गरज

By admin | Updated: December 22, 2014 00:15 IST

उज्ज्वल निकम : दक्षिण भारत जैन सभेच्या पुरस्कारांचे उत्साहात वितरण

कोल्हापूर : इस्लामाबाद येथील भेटीत पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना मी निक्षून सांगितले होते की, दहशतवादाला आवरा, स्वत:ला सावरा; पण त्यांनी दुर्लक्ष केले आणि हेच दुर्लक्ष पेशावरमधील घटनेने त्यांच्यावर उलटले. प्रबळ लोकशाही असलेल्या आपल्या देशाला अहिंसेची परंपरा आहे. दहशतवादाची सध्याची परिस्थिती पाहता भगवान महावीर यांच्या अहिंसावादी तत्त्वांची जगाला गरज आहे, असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज, रविवारी येथे केले. दक्षिण भारत जैन सभेच्या ९४ व्या अधिवेशनात विविध पुरस्कार वितरण व स्मरणिका प्रकाशन समारंभात ते बोलत होते. येथील मार्केट यार्डमधील शाहू सांस्कृतिक मंदिरातील या कार्यक्रमास श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे हे प्रमुख उपस्थित, तर अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील होते.उज्ज्वल निकम म्हणाले, अहिंसाप्रिय असल्याने आपण मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातून सावरलो. भगवान महावीर यांच्या अहिंसावादी तत्त्वांचे पालन करणे गरजेचे आहे. समाजाच्या विकासासाठी जैन बांधवांनी कार्यरत राहावे.श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची जैन समाजातील परंपरा उल्लेखनीय आहे. अ‍ॅड. गोविंद पानसरे म्हणाले, कम्युनिस्ट असलो, तरी धर्मतत्त्वांचे पालन करणाऱ्यांना मानतो.कार्यक्रमात ‘करवीररत्न’ स्मरणिकेचे प्रकाशन झाले. त्यानंतर पंडित सुशीलकुमार उपाध्ये, माजी आमदार प्रा. शरद पाटील, अणुशास्त्रज्ञ शिवराम भोजे यांचा विशेष सन्मान केला. सागर चौगुले, सुरेश रोटे, सुभाष चौगुले, डॉ. जे. एफ. पाटील, डी. सी. पाटील, नगरसेवक राजू लाटकर, अपर्णा आडके, किरण शिराळे, आदी उपस्थित होते. डी. ए. पाटील यांनी प्रास्ताविक केले. सुकुमार बेळंके व पार्श्वनाथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संजय शेटे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)यांचा झाला सन्मान...ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे, डॉ. सुनीलकुमार लवटे, प्रा. साधना झाडबुके, राजेंद्र पाटील-यड्रावकर, डॉ. जयकुमार उपाध्ये (नवी दिल्ली), मीना गरिबे (नाशिक), प्रा. धरणेंद्र कुरकुरी (कर्नाटक), डॉ. कुबेर मगदूम (इचलकरंजी), अजितकुमार भंडे (मालगाव), श्रीधर मेक्कळके (निपाणी), सुधा नेजे (भोज, कर्नाटक), वसंतराव चौगुले नागरी सहकारी पतसंस्था यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले. मानपत्र, शाल, श्रीफळ व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते.निकम म्हणाले...४ समाजातील युवक-युवतींनी स्पर्धा परीक्षांकडे वळावे.४ समाजाच्या तत्त्वांचे पालन होते का, याबाबत अंतर्मुख व्हावे.४पैसा, श्रीमंती यांचे ओंगळवाणे प्रदर्शन टाळून गरजूंना मदत करावी.४जैन समाजातील स्त्रियांना शिक्षणाकडे आकृष्ट करावे.४प्रत्येक ठिकाणी विशिष्ट संरक्षण, आरक्षणाचा न्यूनगंड बाजूला सारावा.