शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘मेक्सिकन सनफ्लॉवर’ची वाढ रोखण्याची गरज, शिवाजी विद्यापीठाकडून निर्मूलन मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 18:01 IST

लाल रंगाचे देखणे फूल, मोठी पाने असणारे ‘मेक्सिकन सनफ्लॉवर’ हे विदेशी वाणाचे तण अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याची वाढ कोल्हापूर जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या बाजूने वेगाने होत आहे.

ठळक मुद्दे‘मेक्सिकन सनफ्लॉवर’ची वाढ रोखण्याची गरजशिवाजी विद्यापीठाकडून निर्मूलन मोहीम; विदेशी तण

संतोष मिठारीकोल्हापूर : लाल रंगाचे देखणे फूल, मोठी पाने असणारे ‘मेक्सिकन सनफ्लॉवर’ हे विदेशी वाणाचे तण अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याची वाढ कोल्हापूर जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या बाजूने वेगाने होत आहे.

निव्वळ फुलांमुळे दिसायला सुंदर असणारे हे तण आपल्या परिसरातील इतर गवत, झाडांची वाढ होऊ देत नाही; त्यामुळे जिल्ह्यातील पर्यावरणाला पूरक ठरत नसलेल्या या तणाची वाढ रोखण्याची गरज आहे. या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाने या तणाच्या निर्मूलनाची मोहीम हाती घेतली आहे.सध्या हे तण कोल्हापूर शहरातील शिवाजी विद्यापीठ आणि जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य, गडहिंग्लज, राधानगरी, आदी परिसरातील रस्त्यांच्या बाजूने आणि शेतीच्या बांधांवर वाढत आहे. ते जनावरे खात नाहीत. त्याच्यावर कोणताही पक्षी बसत नाही. त्याची उंची १० ते १५ फुटांपर्यंत वाढते. त्याच्या परिसरात इतर कोणतेही गवत, झाडे वाढत नाहीत.

विद्यापीठातील दूरस्थ शिक्षण केंद्र, क्रीडासंकुल, वनस्पतिशास्त्र विभाग, मुलांचे वसतिगृह ते आठ नंबर प्रवेशद्वार, आरोग्यकेंद्र ते नाट्य व संगीतशास्त्र विभाग, कुलसचिव निवासस्थान अशा सुमारे १२ एकर परिसरात या तणाची वाढ झाली. ते जैवविविधतेच्या वाढीसाठी पूरक ठरत नसल्याने विद्यापीठाने त्याच्या निर्मूलनाची मोहीम दि. २ आॅक्टोबरपासून हाती घेतली आहे. याअंतर्गत टप्प्याटप्प्याने या तणाचे पूर्णत: निर्मूलन केले जाणार आहे. अन्य गवत, वनस्पतींच्या वाढीला मारक ठरणाऱ्या ‘मेक्सिकन सनफ्लॉवर’ची वाढ वेळीच रोखणे महत्त्वपूर्ण ठरणारे आहे.

जैवविविधतेला धोका नकोमेक्सिकन सनफ्लॉवर हे तण विद्यापीठाच्या परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. त्याचे बारकाईने निरीक्षण केले असता, त्याच्या क्षेत्रात पूर्वी येणारे गवत आणि इतर छोट्या वनस्पती या वर्षी उगवल्या नसल्याचे निदर्शनास आले; त्यामुळे विद्यापीठातील जैवविविधतेला धोका पोहोचू नये, या उद्देशाने विद्यापीठाने ‘मेक्सिकन सनफ्लॉवर’च्या निर्मूलनाची मोहीम सुरू केली आहे. या तणाचे क्षेत्र कमी करण्यात येत असल्याचे उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी सांगितले.

मूळचे मेक्सिकोमधील असणारे ‘मेक्सिकन सनफ्लॉवर’ हे सूर्यफुलाच्या कुळातील तण आहे. त्याचे शास्त्रीय नाव ‘तीथोनीया रोतुण्डिफोलिया’ असे आहे. त्याचे फूल सुंदर दिसत असल्याने ते मेक्सिकोमध्ये उद्यान, बगीचा येथे लावले जाते. या फुलामुळेच आपल्या देशात ‘मेक्सिकन सनफ्लॉवर’आणण्यात आले. आपल्याकडे त्याची वाढ रस्त्याच्या बाजूला, ओसाड जागेत पावसाळ्यामध्ये होते. पावसाळ्यानंतर हे तण वाळून जाते. त्याच्यापासून पर्यावरणाला धोका नाही; मात्र हे तण त्याच्या क्षेत्रातील अन्य गवत, रोपांना वाढू देत नाही; त्यामुळे त्याचे निर्मूलन करणे आवश्यक आहे.- डॉ. मधुकर बाचूळकर, वनस्पतिशास्त्रज्ञ

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर