शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

आजऱ्यात बहुउद्देशीय सभागृहाची गरज

By admin | Updated: December 28, 2015 00:23 IST

नाट्यप्रयोग अथवा इतर मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची आहे, तीच अडचण इतर कार्यक्रमांबाबतही आहे.

ज्योतीप्रसाद सावंत- आजरा  शहरामध्ये असणारी नाट्यचळवळ, सांस्कृतिक व सामाजिक कामाची पार्श्वभूमी, मोठ्या समारंभासाठी जागेअभावी होणारी कुचंबणा व केवळ गैरसोय टाळण्याकरिता गडहिंग्लज व कोल्हापूर येथे पार पडणारे विवाह समारंभ, या बाबींचा विचार केल्यास आजरा शहरामध्ये सर्वसोयीनियुक्त अशा प्रशस्त बंदिस्त बहुउद्देशीय सभागृहाची गरज भासत असून, व्यक्ती अथवा एखाद्या सामाजिक, सहकारी संस्थेच्या माध्यमातून सभागृह उभारण्याची मागणी होत आहे.आजरा शहराला नाट्यचळवळीची परंपरा आहे. आजरेकरांनी ही परंपरा टिकवून ठेवली आहे. गेल्या वर्षापासून आजरा येथे सुरू करण्यात आलेल्या रमेश टोपले स्मृतिप्रीत्यर्थ नाट्यमहोत्सवाच्या माध्यमातून सादर केल्या जाणाऱ्या नाटकांव्यतिरिक्त इतरवेळी केवळ सभागृहाच्या (नाट्यगृहाच्या) अभावामुळे येथे व्यावसायिक नाटकांचे प्रयोग होऊ शकत नाहीत.शहरात असणाऱ्या भाजी मंडईचा वापर खुले नाट्यगृह म्हणून केला जात असला तरी या नाट्यगृहाचा वापर आठवडा बाजाराच्या दिवसाव्यतिरिक्त करावा लागतो. केवळ राजकीय पक्षांच्या सभांपुरताच याचा वापर होताना दिसतो. आजरा हायस्कूल येथे अण्णा-भाऊ सांस्कृतिक सभागृह बांधण्यात आले आहे; पण या सभागृहामध्ये नाटकाचे प्रयोग करणे अशक्य आहे. जी अवस्था नाट्यप्रयोग अथवा इतर मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची आहे, तीच अडचण इतर कार्यक्रमांबाबतही आहे.विद्याधन कॉम्प्लेक्सवर जे. पी. नाईक सभागृह बांधण्यात आले आहे. परंतु या सभागृहाचे जिणे चढून जाताना वयोवृद्ध मंडळींची चांगलीच दमछाक होते. या सभागृहात वीजपुरवठा नाही, स्वच्छतागृह नाही, की पार्किंगही नाही; त्यामुळे बऱ्याचवेळा याचा वापर एखाद्या सहकारी संस्थेची वार्षिक सभा किंवा ‘सेल’ विक्रेत्यांकरिताच होताना दिसतो.आजरा येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या शिवाजीराव सावंत सभागृहाची आसन मर्यादा दोनशेच्यावर नाही. याठिकाणी रस्त्यावरच पार्किंग करण्याशिवाय पर्याय नाही. येथे लिंगायत समाजाचे दुरदुंडेश्वर मंगल कार्यालय आहे. परंतु येथेही मोठे समारंभ घेताना पार्किंगसह अनेक मर्यादा येताना दिसतात.लग्नसमारंभासारखे कार्यक्रम घेण्याकरिता सर्रास शाळांच्या मैदानाचा वापर केला जातो. परंतु, रविवार अथवा सुटीच्या दिवशीच हे कार्यक्रम शालेय कामकाजात व्यत्यय न आणता घेणे बंधनकारक राहते.या पार्श्वभूमीवर आजरा शहरामध्ये पार्किंगच्या सुविधेसह सर्व सोयीनियुक्त अशा बंदिस्त स्वरूपातील बहुउद्देशीय सभागृहाची प्रकर्षाने गरज भासत आहे. एखाद्या सामाजिक अथवा सहकारी संस्थेने पुढाकार घेतल्यास ही गरज पूर्ण होऊ शकते.केवळ सभागृहाअभावी...सर्वसोयीनियुक्त सभागृह, कार्यालय आजरा शहरात नसल्याने मोठ्या स्वरूपात होणाऱ्या विवाहांसारख्या कार्यक्रमासाठी जवळच असणाऱ्या गडहिंग्लज अथवा कोल्हापूरसारख्या शहरांना प्राधान्य दिले जाते.