शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

यड्राव औद्योगिक वसाहत परिसरातील जलस्रोतांच्या भूजल परिक्षणाची गरज, पाणी प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 14:28 IST

water pollution Kolhapur- यड्राव येथील पार्वती औद्योगिक वसाहतीमधील कापडावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांतून येणाऱ्या रसायनयुक्त सांडपाण्यामुळे परिसरातील भूजलातील पाणी प्रदूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे परिसरातील जलस्रोतांच्या भूजल परिक्षणाची गरज निर्माण झाली असून भविष्यात पाणी असूनही त्याचा वापर करता येणार नाही, अशी परिस्थिती उद्भवू शकते. याकरीता प्रदूषण नियंत्रण मंडळ व भूजल सर्वेक्षण विभागाने वेळीच लक्ष घालणे अत्यावश्यक बनले आहे.

ठळक मुद्देयड्रावच्या जलस्रोतांच्या भूजल परिक्षणाची गरज औद्योगिक वसाहत परिसरातील पाणी प्रदूषित

घन:शाम कुंभार

यड्राव : येथील पार्वती औद्योगिक वसाहतीमधील कापडावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांतून येणाऱ्या रसायनयुक्त सांडपाण्यामुळे परिसरातील भूजलातील पाणी प्रदूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे परिसरातील जलस्रोतांच्या भूजल परिक्षणाची गरज निर्माण झाली असून भविष्यात पाणी असूनही त्याचा वापर करता येणार नाही, अशी परिस्थिती उद्भवू शकते. याकरीता प्रदूषण नियंत्रण मंडळ व भूजल सर्वेक्षण विभागाने वेळीच लक्ष घालणे अत्यावश्यक बनले आहे.पार्वती औद्योगिक वसाहतीमधील काही ठिकाणच्या बोअरवेलमधील पाणी हे प्रदूषित असल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा जलप्रदूषण गुणवत्ता अहवाल, २०१९-२०मध्ये आहे. पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये मनपसंद टेक्स्टाईल, जुबिली प्रोसेस, बीडला प्रोसेस, इचलकरंजी टेक्सटाइल्स व बाहुबली प्रोसेस या उद्योगांमधून कापडावर प्रक्रिया करण्यात येते. त्यांच्या पाणी प्रक्रिया प्रकल्पातून शुद्धीकरण झालेल्या पाण्याचा पुनर्वापर करत असल्याचा दावा संबंधीतांकडून केला जातो.प्रक्रिया झालेल्या पाण्याचा पुनर्वापर साडेचार एकर जागेत बांबू लागवडीसाठी व वसाहतीमध्ये लावलेल्या २५०० वृक्ष जतनासाठी केला जातो. औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे २५० उद्योग सुरू आहेत. त्यापैकी अंदाजे १५० हुन अधिक उद्योगांनी स्वत: कूपनलिका खोदल्या आहेत. कापडावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांनी रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया करून पुनर्वापर तर कोरड्या विहीरी व बिनपाण्याच्या कुपनलिकांमध्ये सोडून सांडपाण्याची विल्हेवाटही लावण्याचे प्रयोग उद्योजकांकडून झाले आहेत. तसेच या पाण्याचा वापर शेती, इतर कारणासाठी केला गेला. या सर्व कारणांमुळे परिसरातील कुपनलिका, विहिरी प्रदूषित बनण्यास कारणीभूत ठरल्याने तेथील सांडपाण्याचे नमुने वेळोवेळी परिक्षणासाठी घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने सिद्ध केले आहे.या उद्योगाच्या परिसरातील कुपनलिका व विहिरीतील पाण्याचे परिक्षण करून ते पाणी शेतीसाठी, व सजीवांना पिण्यासाठी योग्य आहे का, याची प्रयोगशाळेमधून सिद्धता करावी लागेल. अन्यथा पाणी आहे पण त्याचा कोणासही उपयोग नाही अशी परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे येथील प्रदुषण दूर करण्यासाठी प्रदुषण नियंत्रण मंडळ व भूजल सर्वेक्षण विभागाने येथील पाण्याचे परिक्षण करणे अत्यावश्यक बनले आहे. सांडपाण्याने परिसर दुषितइचलकरंजीच्या टेक्स्टाईल उद्योगांमध्ये जुबिली  वर्षापासून कापडावर प्रक्रिया करण्याचा व्यवसाय पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू करून बाहुबली बनलेल्या उद्योजकांनी परिसर दूषित केला आहे हे परिसरास मनपसंद नाही.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणkolhapurकोल्हापूर