शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

पालिका कारभारात विश्वासार्हतेची गरज

By admin | Updated: May 25, 2015 00:36 IST

पक्षांना आत्मचिंतनाची गरज : इचलकरंजीत जनहिताचे प्रकल्प मार्गी लागणे आवश्यक

राजाराम पाटील - इचलकरंजी -शहराच्या विकासासाठी अत्यावश्यक असलेले आणि शासनदरबारी प्रलंबित असलेले महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागण्यासाठी नगरपालिकेची विश्वासार्हता पुन्हा संपादित होणे आवश्यक आहे. त्यामुळे काळम्मावाडी धरणातून थेट पाणीपुरवठा, शहर स्वच्छता आराखडा व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलचे आधुनिकीकरण असे नागरिक हिताचे प्रकल्प सुरू होतील.नगरपालिकेत राष्ट्रीय कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस व शहर विकास आघाडी यांचे अनुक्रमे २९, ११ व १७ असे नगरसेवक आहेत. त्यामध्ये माकप, डावी आघाडी अशा पक्षांचा समावेश नाही; पण कॉँग्रेसमध्ये आवाडे व डाळ्या, राष्ट्रवादीमध्ये कारंडे जांभळे आणि शहर विकास आघाडीमध्ये भाजप, शिवसेना व बंडखोर कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा समावेश आहे. नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्या बंडामुळे जानेवारीपासून ‘सबका साथ, सबका विकास’ म्हणत सर्वच नगरसेवक सत्तेत आले.कोणा एका पक्षाची किंवा आघाडीची सत्ता नसल्याने पालिकेच्या कामकाजात गोंधळ निर्माण झाला. पूर्वी मोजकेच नगरसेवक मक्तेदार होते. आता ‘ठेकेदार’ नगरसेवकांची संख्या वाढली आणि पालिकेच्या कारभाराचा बट्ट्याबोळ झाला. वाढलेली बजबजपुरी संपुष्टात आणण्यासाठी शहर विकास आघाडीचे संस्थापक - आमदार सुरेश हाळवणकर यांना जातीने मैदानात उतरावे लागले. त्यांनी तडक मुख्याधिकारी सुनील पवार यांच्या कार्यालयात येऊन झाडाझडती घेतली. नगरपालिका कार्यक्षेत्रातील बाह्यवळण रस्ता व शहरांतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी मिळालेले बारा कोटी रुपयांचे अनुदान थेट शासनाच्या पीडब्लूडी मार्फत खर्च होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही नगरपालिकेच्या गोंधळाच्या कारभाराला सणसणीत चपराक होती.आता मात्र पालिकेत असलेल्या सर्व घटक पक्षावर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. परस्परांशी समन्वय साधून नियोजनबद्ध कामे केल्यास नागरी सेवा-सुविधांची रस्ते, स्वच्छता, दिवाबत्ती, आरोग्य, पाणीपुरवठा अशी कामे सुलभतेने होतील. त्यासाठी मात्र ठेकेदार पद्धत दूर ठेवली पाहिजे. काळम्मावाडी पाणी योजना, घनकचरा व्यवस्थापन, इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलचे आधुनिकीकरण, भुयारी गटर योजना, पाणी प्रक्रिया प्रकल्प असे प्रकल्पही आ. हाळवणकर यांच्यामार्फत आणि त्यांच्या पाठपुराव्याने कार्यान्वित करून घेणे अत्यावश्यक आहे.