शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

ई-कचऱ्याबाबत जनजागृती करणे गरजेचे : फरास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 17:08 IST

‘रोटरी’तर्फे ‘इलेक्ट्रॉनिक कचरा जागृती अभियान’

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि.२४ : सध्या जागतिक पातळीवर ई-कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ई-कचरा ठेवायला जागा मिळत नाही, या वस्तू दररोजच्या कचऱ्यात सापडतात. ओल्या क चऱ्यात अशा वस्तू मिसळल्यामुळे त्याचा मानवी शरीरावर परिणाम होतो. शहरासह ग्रामीण भागासाठी हा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत समाजात जागृती होणे गरजे आहे, असे प्रतिपादन महापौर हसिना फरास यांनी केले.

पेटाळा येथील राम गणेश गडकरी सभागृहात सोमवारी दुपारी रोटरी क्लब आॅफ करवीर, दि रोटरी करवीर चॅरिटेबल ट्रस्ट, न्यू एज्युकेशन सोसायटी, शिक्षण उपसंचालक विभाग, कोल्हापूर, महाराष्ट्र प्रदर्शन नियंत्रण महामंडळ, कोल्हापूर विभाग व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘इलेक्ट्रॉनिक कचरा जागृती अभियान’ कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी पी.डी.जी. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे डॉ. वासुदेव देशिंगकर होते.

महापौर फरास म्हणाल्या, ई-कचरा जळून किंवा जमिनीत पुरूनही नाश पावत नाही तसेच त्या उघड्यावरही कुठेही टाकून चालत नाही. ई-कचऱ्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. त्यासाठी समाजात जागृती करणेच हाच एकमेव उपाय आहे. अध्यक्षीय भाषणात डॉ. देशिंगकर म्हणाले, पर्यावरण संबंधित या समस्येबाबत ‘रोटरी’च्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे. ई-कचऱ्याचा मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होतेच पण पर्यावरण संतुलन बिघडत आहे. याबाबत जनजागृती करून जास्तीत जास्त प्रमाणात ई-कचरा संकलित करणे हा उद्देश आहे. कारण यांचे योग्यप्रकारे पुनर्वापर झाला तरच हा प्रश्न सुटणार आहे.

ई-कचरा व प्लास्टिक जागृती अभियान अध्यक्ष एस. एन. पाटील म्हणाले, शहरातील महानगरपालिका तसेच खासगी शाळांतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरामधील अडगळीतील,परिसरातील ई-कचरा आणून तो शाळेत जमा करायचा आहे. शाळांमधील हा ई-कचरा ‘रोटरी’च्यावतीने संकलित करून त्याचा योग्य पुनर्वापर करण्यासाठी देण्यात येणार आहे. गेली चार वर्षे शहरातील २५० शाळांमध्ये ‘ई-कचरा संकलन’ उपक्रम राबविला जाणार आहे. त्यामध्ये हजारो विद्यार्थी सहभागी होतात तरी विद्यार्थ्यांनी २९ जुलैपर्यंत घरातील ई-कचरा शाळेत जमा करावा.

यावेळी न्यू एज्युकेशन सोसायटीचे पी. एस. हेरवाडे यांनी मनोगत व्यक्त केले तर ई-कचरा व प्लास्टिक जागृती अभियानाचे सचिव प्रमोद चौगले यांनी उपक्रमाबाबत प्रेझेंटेशन देऊन आभार मानले. कार्यक्रमास रोटरी डिस्ट्रिक्टचे हृषीकेश केसकर, रोटरी क्लब आॅफ करवीरचे अध्यक्ष विशाल जांभळे यांच्यासह ‘रोटरी’चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.