शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
3
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
4
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
5
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
6
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
7
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
8
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
9
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
10
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
11
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
12
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
13
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
14
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
15
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
16
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
17
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
18
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
19
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
20
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!

मसाई पठाराच्या संवर्धन आणि विकासाची गरज

By admin | Updated: October 29, 2014 00:14 IST

दहा किलोमीटर लांबी : पाचगणीच्या ‘टेबल लँड’पेक्षा दहा पटीने मोठे

किरण मस्कर - कोतोली -मसाई पठार हे आशिया खंडातील मोठ्या पठारांपैकी एक प्रसिद्ध पठार आहे. पश्चिम महाराष्ट्रामधील कोकण व घाटावरील भागाच्या मधोमध असणारे मसाई पठार हे एक निसर्गरम्य स्थान असून, याचे क्षेत्र पाचगणी येथील टेबल लँडपेक्षा दहा पटीने मोठे आहे. येथे अतिशय सुंदर अशा पांडवकालीन गुहा आहेत. या ठिकाणच्या कोरीव गुहांना ‘पांडव लेणी’ असे म्हणतात. मसाईदेवीचे सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या समोरील उत्तर बाजूला ‘पांडवदरा’ आहे. ह्या पठारास तलावांचे पठार असेही म्हणतात. या ठिकाणी २ मोठ्या आणि २ लहान गुहा आहेत. एक भुयारी मार्ग असून, मोठ्या गुहेत १ पाडवी, मोठे माजघर, त्याच्या आत १ लहान खोली असून बाजूच्या भिंतींना खांबाचे आकार दिले आहेत. इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात या गुहा खोदल्या असाव्यात आणि त्यात धार्मिक शिक्षण दिले जात असावे, अशी कागदोपत्री नोंद आहे. मसाई देवळाखाली दुसऱ्या बाजूला जाणारा भुयारी मार्ग आजही अस्तित्वात आहे. या गुहेला ‘चकवा गुहा’ म्हणतात. मसाई पठारापासून पश्चिमेला थोड्याच अंतरावर दगडांनी उभी असलेली कुवारणी आजही पहावयास मिळत आहे. जणू नवी वधू (नवरी) शालू नेसून उभी असल्याचे चित्र आजही पहावयास मिळत असून पावसामुळे हिरवीगार वेली त्यावर चढलेली पहावयास मिळत आहेत. पठाराचा व्याप मोठा असल्याने यावर पाण्याचा, वाऱ्याचा वेग प्रचंड आहे. या वाऱ्याचा उपयोग करून घेऊन ‘पवनचक्कीद्वारा वीजनिर्मिती’चा प्रयत्न होता. त्यासाठी पठारावर वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी ‘वारामापक यंत्र’ बसविले होते. पठाराचा बहुतेक भाग वनखात्याच्या अखत्यारित आहे. खात्याने प्रत्येक दरीत वृक्षारोपण करून झाडी वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. अलीकडच्या काळात मसाई पठाराचा विकास व्हावा, पर्यटन केंद्र व्हावे म्हणून काही हौशी तरुणांनी पंचवार्षिक आराखडा तयार केला. त्यात पठारावर जाण्या-येण्यासाठी रस्ता तयार करणे, दऱ्याखोऱ्या वनश्रीने नटविणे, ईगल ‘मंकीनोज’सारखे पिकनिक पॉर्इंट तयार करणे, २ कि.मी. परिघाच्या ‘ईश्वर म्हादू’ तलावातील गाळ काढून तो पर्यटकांना पोहण्यासाठी खुला करणे. दऱ्यातील जिवंत झऱ्यांना हौद बांधून पिण्याच्या पाण्याची सोय करणे, गुहा साफ करणे, विश्रांतीगृह याचा समावेश आहे. (समाप्त)मसाई पठार पूर्णपणे जांभी दगडाचे असून २०० ते ८०० फूट रूंद अशा वेगवेगळ््या दहा पठारांनी ते बनले आहे. पठाराच्या बाजूला सुमारे दोनशे ते सहाशे फूट खोल दरी असून या दरीमधून बारमाही वाहणारे पाण्याचे जिवंत झरे पहावयास मिळतात. येथे ३० ते ३५ गुहा असून त्या १०० ते १५० फूट आत खोलवर खोदल्या आहेत.