शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

राष्ट्रवादीची भूमिका लवकरच ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2015 00:43 IST

महापालिका : १७ रोजी काँग्रेसची बैठक शक्य

सांगली : काँग्रेसचे नेते मदन पाटील यांच्या निधनानंतर महापालिकेत निर्माण झालेला राजकीय पेच सोडविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चढाओढ लागली आहे. येत्या डिसेंबरअखेरीपर्यंत राष्ट्रवादीची भूमिका निश्चित होण्याची शक्यता आहे. तसेच आ. पतंगराव कदम व विश्वजित कदमही नगरसेवकांना एकसंध करण्यासाठी बैठक घेणार आहेत. ही बैठक १७ डिसेंबर रोजी होणार असल्याचे महापौर विवेक कांबळे यांनी सांगितले. महापालिकेत मदन पाटील यांचा गट सर्वात मोठा आहे. आजअखेर याच गटाकडे पालिकेची सूत्रे राहिली आहेत. महापौर पदापासून ते अगदी सभापती पदापर्यंत सर्व पदे मदनभाऊ गटाकडे आहेत. पण त्यांच्या निधनाने पालिकेतील राजकारण बदलले आहे. गेल्या वर्षभरात मदनभाऊ व राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांच्यात सूर जुळले होते. जयंतरावांनीही मदनभाऊ गटाच्या भविष्यातील राजकीय वाटचालीच्या निर्णयात आपला सहभाग असेल, असे जाहीरपणे सांगितले होते. मदनभाऊ गटानेही जयंतरावांशी राजकीय वैर विसरून एकत्र येण्याची मानसिक तयारी चालविली आहे. त्याला काहींचा विरोध आहे. या घडामोडीतच आता पतंगराव कदम व विश्वजित कदम यांनीही उडी घेतली आहे. कदम पिता-पुत्रानी पालिकेवरील काँग्रेसची सत्ता कायम ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. पतंगरावांनीही वेळप्रसंगी जयंतरावांना सोबत घेण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे पुढील महिन्याभरात पालिकेतील राजकारणाची दिशा ठरणार आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस विरोधक म्हणून काम करीत आहे. हीच भूमिका कायम ठेवून मदनभाऊ गटाला सहकार्य करण्यात येणार आहे. मध्यंतरी जयंतराव पाटील व जयश्रीताई पाटील यांच्यात बैठक होणार असल्याची चर्चा होती. पण आतापर्यंत अशी कोणतीही बैठक झालेली नाही. राष्ट्रवादीकडून डिसेंबरअखेरपर्यंत भूमिका स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत. पतंगराव कदम व विश्वजित कदम यांनी काँग्रेस नगरसेवकांना एकसंध ठेवण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. पतंगरावांनी हिवाळी अधिवेशनानंतर नगरसेवकांची बैठक घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार १७ डिसेंबर रोजी महापौरांच्या फार्म हाऊसवर बैठक होण्याची शक्यता आहे. महापौर विवेक कांबळे यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. (प्रतिनिधी)कदमांनी कंबर कसली या घडामोडीतच आता पतंगराव कदम व विश्वजित कदम यांनीही उडी घेतली आहे. कदम पिता-पुत्रानी पालिकेवरील काँग्रेसची सत्ता कायम ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. पतंगरावांनीही वेळप्रसंगी जयंतरावांना सोबत घेण्याची तयारी चालविली आहे.