शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीतील निष्ठावंत कुणामुळे दूर गेले..?

By admin | Updated: March 1, 2017 00:50 IST

धनंजय महाडिक; हसन मुश्रीफ यांचे वक्तव्य गैरसमजातून

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी खासदार निवेदिता माने, आमदार संध्यादेवी कुपेकर, अशोक जांभळे, धैर्यशील माने, मानसिंग गायकवाड यांच्यासह अनेक निष्ठावंत नेते कार्यकर्ते पक्षापासून दूर गेले. ही वेळ त्यांच्यावर कुणी आणि का आणली, अशी विचारणा खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली. सोमवारी पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या सत्कार समारंभात मुश्रीफ यांनी ‘महाडिक यांना पक्षात राहायचे आहे की नाही हे एकदा ठरवावे,’ अशी टीका केली होती. त्यास महाडिक यांनी प्रत्युत्तर दिले; परंतु त्यांची भाषा मवाळ असून मुश्रीफसाहेब हेच आपल्याला आदरणीय असून त्यांनी गैरसमजातून असे वक्तव्य केले असल्याचे म्हटले आहे.महाडिक म्हणतात, ‘कार्यकर्त्यांची कदर करणारा’ अशीच माझी ओळख आहे. मी राष्ट्रवादी पक्षाचाच खासदार आहे. या पक्षाचे जिल्ह्यातील ‘सर्वेसर्वा’ आमदार मुश्रीफ यांच्या वक्तव्यामुळे कमालीच्या वेदना झाल्या आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत मी कुठेही काम केलेले नाही. आमदार मुश्रीफ यांचा गैरसमज झाला असून ‘भाबडे’पणाने त्यांनी ते विधान केले असावे. लोकसभा निवडणुकीत ‘मोदी लाट’ असतानाही कोल्हापूरच्या जनतेने मला निवडून दिले याची जाणीव ठेवून मी पदाला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत मी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात राष्ट्रवादीच्या चिन्हावर उमेदवार उभे करून पक्षाची वाढ करण्याचे नियोजन केले होते. मात्र, मुश्रीफ यांनी काँग्रेसशी आघाडी करण्याचा निर्णय घेतल्याने मी अलिप्त राहिलो. दुसरीकडे श्रीमती निवेदिता माने, कुपेकर यांच्यासारखे निष्ठावंत पक्षापासून का दूर गेले याच्या खोलात मी जात नाही परंतु त्याची मला खंत वाटते.भूमिकेत बदल..नगरपालिका निवडणुकीत तालुकानिहाय वेगवेगळी समीकरणे आकारास आली. कागल तालुक्यातील राजकीय समीकरणांबाबत मी कधीही प्रश्न उपस्थित केलेला नाही आणि माझा तो अधिकारही नाही. तथापि, आमदार मुश्रीफ हे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक असून पक्षाच्या विरोधात कोणतीही कृती माझ्याकडून झालेली नाही. त्यामुळे मी पक्षात राहणार की नाही, हा प्रश्नच येत नाही व मुश्रीफसाहेब यांच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा माझा प्रयत्न असेल, असे महाडिक यांनी म्हटले आहे. महाडिक यांनी २१ जानेवारीस प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कागलमध्ये मुश्रीफ यांना शिवसेनेशी संगत कशी चालते, अशी विचारणा केली होती; परंतु पक्षात राहून त्यांना इतक्या लवकर आव्हान द्यायला नको म्हणून हा माझा अधिकार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. यांच्यामुळे झाला विजयलोकसभा निवडणुकीतील माझ्या यशामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस, जनसुराज्य, आरपीआय, धनंजय महाडिक युवाशक्ती, ‘गोकुळ’चे सभासद, माजी आमदार महादेवराव महाडिक यांना मानणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांसह सामान्य जनतेने भरभरून मतदान केल्याने मी निवडून आलो, असे खासदार महाडिक यांनी म्हटले आहे.