शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी नगरपालिका स्वबळावर लढणार : पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 01:25 IST

निरीक्षकांच्याही नियुक्त्या : उमेदवारी मागणी अर्जांचे वाटप सुरू

कोल्हापूर : मित्रपक्ष सोबत आले तर ठीक; अन्यथा नऊ नगरपालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. नगरपालिकेसाठी पक्षाच्या उमेदवारी मागणीच्या अर्जांचे वाटप सुरू झाले असून, बुधवारी एकाच दिवशी तब्बल ८०१ जणांनी अर्ज नेल्याचेही त्यांनी सांगितले. नगरपालिकेच्या २०११ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने पन्हाळा वगळता सर्व जागा लढविल्या होत्या. त्यापैकी १०९ नगरसेवक निवडून आणण्यात यश आले होते. यावेळेला मित्रपक्ष सोबत राहावेत, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे. ते सोबत आले तर ठीक; अन्यथा स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी पक्षाने केल्याची माहिती ए. वाय. पाटील यांनी दिली. कागल, मुरगूड, गडहिंग्लज, शाहूवाडी, पन्हाळा, पेठवडगाव, इचलकरंजी, जयसिंगपूर, कुरुंदवाड या नगरपालिकांसाठी इच्छुक असणाऱ्यांना प्रदेश राष्ट्रवादीकडून आलेले विहित नमुन्यातील अर्ज आज, गुरुवारपासून रविवार (दि. २३)पर्यंत वाटप करण्यात येणार आहेत. अर्ज भरून पक्ष कार्यालयाकडे पाठविण्याची मुदत २४ ते २९ आॅक्टोबरपर्यंत आहे. ही निवडणूक प्रक्रिया प्रदेश निरीक्षक दिलीप पाटील व जिल्हा निरीक्षक अनिलराव साळोखे यांच्या नियंत्रणाखाली राबविली जाणार असून, त्याशिवाय नगरपालिकानिहाय सहायक निरीक्षकांची नेमणूक केल्याचेही पाटील यांनी सांगितले. यावेळी जिल्हा सरचिटणीस अनिलराव साळोखे उपस्थित होते. विनय कोरेंसोबत आज चर्चा ! ‘जनसुराज्य’ पक्ष हा आमचा पारंपरिक मित्रपक्ष आहे. ते या निवडणुकीत आमच्याबरोबर राहतील, असे वाटते. याबाबत आज आमदार हसन मुश्रीफ हे त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही जिल्हाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.