शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

राष्ट्रवादी-जनसुराज्यची सत्ता अबाधित

By admin | Updated: July 15, 2015 01:17 IST

साडेतेरा तासांनी पहिला निकाल

विकास सेवा संस्था गटातील सर्वसाधारण सात जागांची मतमोजणी प्रथम करण्यात आली. २८ टेबलवर दुपारी चारपर्यंत या गटाची मोजणी राहिली. प्रत्येक टेबलवर २५ मतपत्रिकेचे गठ्ठे करून मोजणी केली. सर्वसाधारण सात जागांसाठी उमेदवारांची संख्या ४३, त्यात क्रॉस व्होटिंग असल्याने मोजणी कर्मचाऱ्यांची गती कमालीची मंदावली. सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीचे सर्वच उमेदवार आघाडीवर राहिले. राधानगरी, भुदरगड, पन्हाळा तालुक्यांत एकतर्फी मतदान झाले. कागलमध्ये राष्ट्रवादीने वर्चस्व ठेवले असले तरी शिवसेना-भाजपच्या उमेदवारांनीही चांगले मतदान घेतले. साडेचार हजार मतमोजणीनंतर राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार एक हजारच्या फरकाने पुढे होते. रात्री साडेनऊ वाजता विकास संस्था गटातील सात जागांचा निकाल घोषित करण्यात आला. उशिरापर्यंत उर्वरित गटांतील मतमोजणीचे काम सुरू होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मोनिका सिंह काम पाहत आहेत. '

विकास संस्था सर्वसाधारण गट -राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडी-विजयी उमेदवार- सर्जेराव पाटील (६२१२), उदयसिंग पाटील (६१७९), दशरथ माने (६१०१), कृष्णात पाटील (६०२९), बाबासो लाड (५६५३), परशराम खुडे (५६४०), विलास साठे (५३३९) आशालता आनंदराव पाटील (६0९२), शारदा सरदार पाटील (६१५६), उत्तम बळीराम धुमाळ (६३९९), शेखर भगवान येडगे (६२५६).पराभूत- शिवसेना-भाजप आघाडी-सुरेश काटकर (३३१७), कुंडलिक कारंडे (३१४३), अनिल पाटील (२४०६), अरविंद पाटील (२६२६), नाथाजी पाटील (२७९४), बाबगोंडा पाटील (२५८०), शिवाजी बच्चे (२३५९). काँग्रेस आघाडी - पांडुरंग काशीद (२५३२), पंडित पाटील (२२८०), भारत पाटील (२५९६), शंकर पाटील (२२०१), सुभाष पाटील (२२९८), संभाजी पाटील (२६४४), प्रदीपराव सरनोबत (१७९८).अपक्ष- जयवंत कुराडे (८१), मारुती निगवे (३३), धनाजी पंडे (३२), अजित पाटील (३२), केरबा पाटील (३२), जयसिंग पाटील (३५), बाजीराव पाटील (१९), बळिराम पाटील (२३), मधुकर पाटील (२६), यशवंत पाटील (२६), वसंतराव पाटील (१३), विजयसिंह पाटील (२१), शहाजी पाटील (११), शामराव पाटील (२०), शिवाजी पाटील (११), सदाशिव पाटील (२३), संभाजी पाटील (५९), संभाजी पाटील (४९), पांडुरंग बाऊचकर (५५), सदाशिव बाटे (१६), सतीश मगदूम (२४), विलास सरनाईक (७६). ग्रामपंचायत गट, अडते- व्यापारी, हमाल -तोलाई, कृषी -पणन या गटातील मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरु होती. (प्रतिनिधी).गगनबावड्यात उदय पाटील यांना चांगले मतदान प्रचार मेळाव्यात सतेज पाटील व खासदार धनंजय महाडिक यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला होता. त्यामुळे हे दोन्ही गट एकमेकाला मदत करणार याविषयी उत्सुकता होती. गगनबावडा तालुक्यातील मोजणी सुरू असताना सगळ्यांच्या नजरा त्या पेटीकडे लागल्या होत्या. येथे आघाडीच्या इतर उमेदवारांबरोबरच महाडिक समर्थक उदय पाटील-कावणेकर यांना मते मिळाल्याने दगाफटका झाला नसल्याची चर्चा सुरू होती. साडेतेरा तासांनी पहिला निकालविकास संस्था गटातील ११ पैकी सात जागांचा निकाल तब्बल साडेतेरा तासांनी लागला. मतमोजणीची यंत्रणा एकदम सावकाश होती. त्यात टेबलांची संख्या कमी असल्याने संपूर्ण यंत्रणाच धिम्या गतीने सुरू होती. यामुळे कार्यकर्त्यांसह पोलीस यंत्रणा व मोजणी कर्मचारी अक्षरश: वैतागून गेले होते. शिवसेना-भाजप पहिल्यांदाच बाजार समितीच्या रिंगणात उतरली होती. विकास संस्था गटात दोन्ही काँग्रेसचे प्राबल्य असतानाही आम्हाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्यात जिल्हा बॅँकेच्या सत्तेचा परिणाम मतदानावर झाला. आगामी काळात चांगल्या कारभाराला आमचे पाठबळ असेल; पण चुकीचा कारभार झाला तर विरोध करू.- आमदार चंद्रदीप नरके (नेते, शिव-शाहू परिवर्तन आघाडी) ‘पी. एन.’ यांना संपविण्याच्या नादात...भुदरगडमधील एका मतपेटीत ‘पी. एन. पाटील साहेब, गट संपविण्याच्या नादात तुम्ही संपलात. तुमचे सहकारी कधी सैनिक झाले, हे तुम्हालाही कळले नाही. अजून वेळ गेलेली नाही, सुधरा. सच्चा काँग्रेसप्रेमी’ अशा चिठ्ठीद्वारे मतदाराने इशारा दिला.