शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीस माने-यड्रावकर यांच्या ‘ताकदी’ची गरज

By admin | Updated: January 9, 2017 23:39 IST

पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी दोन्ही तालुक्यांत प्रयत्न केले जातील,

आयुब मुल्ला-- खोची --हातकणंगले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात जिल्हा नेतृत्वाकडून हातकणंगले, शिरोळ तालुक्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षाचा पाढाच वाचला गेला. त्यामुळे रविवारचा मेळावा हा जिल्हा नेतृत्वाला लक्षवेधी सूचना देणारा ठरला, तर कार्यकर्त्यांना रिचार्ज करणाराही ठरला.माजी खासदार निवेदिता माने व शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आपल्यातील नाराजीची खदखद व्यक्त केली. याची दखल घेत वस्तुस्थिती समजावून घेत, अखेर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी माने-यड्रावकर यांच्या सहकार्यावर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकू शकतो, असे सांगितले.दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस संपली, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे झालेला मेळावा महत्त्वपूर्ण झाला होता.मेळाव्याला प्रतिसाद मिळणार की नाही, याविषयी तालुक्यात चर्चा होती; परंतु माजी खासदार निवेदिता माने यांना मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यातील बऱ्याच कार्यकर्त्यांनी माने गटाकडे पक्षाने केलेल्या दुर्लक्षाची दखल घेत नाराजी व्यक्त केली.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी अत्यंत स्पष्टपणे भूमिका मांडली. त्यांनीही पक्ष नेत्यांच्या भूमिकेवर तोफ डागली. शिरोळ तालुक्यात पर्यायी गट तयार करण्यास मदत केली जाते, असा आरोप केला. पक्षाच्या विरोधात नेतेच येतात. नगरपालिका निवडणुकीत शक्ती देण्याचे सोडाच, पण साधी सहानुभूतीसुद्धा दाखविली गेली नाही, तरीसुद्धा बहुमत सिद्ध केले. यापुढे स्थानिक नेतृत्वाला विचारूनच निर्णय घ्या. हातकणंगले, शिरोळ तालुक्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. निष्ठा तपासण्यासाठी नवीन थर्मामीटर वापरा. हातकणंगलेत अकरा, तर शिरोळमध्ये सात असे अठरा जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत. इकडे लक्ष दिले तरच सत्ता येऊ शकते, असा टीकात्मक समाचार घेत सल्ला दिला. पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी दोन्ही तालुक्यांत प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.निवेदिता माने व राजेंद्र पाटील यांनी आपल्यातील खदखद व्यक्त केली. सूचना केल्या. पुन्हा नव्याने लढण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांच्या भाषणाला टाळ्यांची साथ दिली.जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता यावयाची असेल, तर माने-यड्रावकर यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य उपयोगी असल्याचे सांगितले. त्यानुसार स्थानिक नेतृत्वाला सर्व अधिकार दिल्याचे त्यांनी घोषित केले.त्यामुळे निवेदिता माने, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना हातकणंगले, शिरोळचे सर्व अधिकार निवडणुकीसाठी दिले, असे सांगावे लागले. पक्षावरची निष्ठा कमी होऊ देणार नाहीनिवेदिता माने यांनी जिल्ह्यातील पक्षाचे नेते कसे चुकले आहेत, हे सांगितले. या नेत्यांनी शक्तिस्थळे असणाऱ्या तालुक्यांकडे अधिक लक्ष देत शिरोळ, हातकणंगलेकडे दुर्लक्ष क रीत असल्याचा मुद्दा उपस्थित केला; परंतु आम्ही पक्षावरची निष्ठा कमी होऊ देणार नाही. स्वर्गीय बाळासाहेब माने यांच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या पाठबळावर पंचायत समितीवर झेंडा फडकवू, तसेच जिल्हा परिषद सदस्यही जास्त निवडून आणू, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. कोणत्याही निवडणुका आल्या की, आमच्याबद्दल इतर पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चा काहीजण मुद्दाम करतात; परंतु शरद पवार यांच्यावर निष्ठा असल्याने आम्ही पक्ष सोडण्याचा संबंधच येत नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितल्याने पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये असलेला संभ्रम दूर झाला.