शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीने महामार्ग रोखला

By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST

भुजबळांच्या अटकेचा निषेध : आंदोलक ताब्यात; पुणे-बंगलोर महामार्गावरील वाहतूक ठप्प

कोल्हापूर : माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधार्ह कोल्हापुरात मंगळवारी पडसाद उमटले. तावडे हॉटेल येथील पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करून सत्ताधारी भाजप-शिवसेनेचा निषेध केला.सोमवारी (दि. १४) ‘इडी’ने छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळ्याप्रकरणी अटक केली. भुजबळ यांच्या अटकेचे पडसाद राज्यात विविध ठिकाणी उमटले. कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग रोखला. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पूर्ववत वाहतूक सुरू झाली. ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना पोलिस व्हॅनमध्ये घातल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.यावेळी ए. वाय. पाटील म्हणाले, भाजप-शिवसेना सरकारने छगन भुजबळ यांच्यावर सूडबुद्धीने अटकेची कारवाई केली आहे.या सरकारचा आम्ही निषेध करतो. या आंदोलनात माजी शहराध्यक्ष आर. के. पोवार, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे, प्रदीप पाटील-भुयेकर, सुनील देसाई, नितीन पाटील, सुनील साळोखे, आप्पासाहेब धनवडे, हंबीरराव पाटील,जयकुमार शिंदे, दर्शन चव्हाण, संतोष धुमाळ, बाळासाहेब खैरे, निरंजन कदम, लाला जगताप, फिरोज सरगूर, सरस्वती रजपूत, हिराबाई म्हातुगडे, चंद्राबाई रावळ, आदींचा सहभाग होता.छगन भुजबळ यांना अटक केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आंदोलनात चक्क पेन्शनधारक महिलांना वेठीस धरले. ‘पेन्शन देतो,’ म्हणून त्यांना रणरणत्या उन्हात उपाशीपोटी बसविल्याच्या तक्रारी याच महिलांनी केल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पितळ उघडे पडले. या आंदोलनात हुपरी (ता. हातकणंगले) येथील ४० ते ५० वयोवृद्ध महिला सहभागी झाल्या होत्या. पोलिसांनी त्यांना अटक करून लगेच सुटका केली; पण यामुळे त्या चांगल्याच घाबरल्या होत्या.‘पेन्शनसाठी आंदोलन असल्याचे सांगत सकाळी टेम्पोत भरून आम्हाला इथे आणले आहे. मात्र, हे आंदोलन वेगळेच असल्याचे पाहून संबंधित महिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली.