शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
6
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
7
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
8
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
9
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
10
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
11
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
12
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
13
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
14
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
15
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
16
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
17
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
18
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
19
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
20
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश

वळंजूंसमोर नवख्यांचे ‘आव्हान’

By admin | Updated: October 22, 2015 00:53 IST

लढतीकडे साऱ्यांच्याच नजरा : सहाजण रिंगणात; साम, दाम, दंड, भेद या नीतीचा अवलंब

कोल्हापूर : शास्त्रीनगर-जवाहरनगर प्रभागात माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्यासमोर नवख्या उमेदवारांनी आव्हान उभे केले आहे. या प्रभागात सहा उमेदवार निवडणूक रिंंगणात आहेत. त्यामुळे प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. प्रमुख पक्षासह अपक्षही रिंंगणात असल्यामुळे मतांची विभागणी होणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांची विजयी होण्यासाठी कसोटी लागणार आहे. प्रभागात शेवटच्या टप्प्यात साम, दाम, दंड, भेद या नीतीचा अवलंब होणार आहे. लढतीकडे साऱ्यांच्याच नजरा लागल्या आहेत.प्रभागात राष्ट्रवादीकडून शादाब नजमल अत्तार, काँग्रेसकडून दत्ता दौलतराव कांबळे, शिवसेनेकडून नियाज असिफ खान, ताराराणी आघाडीकडून नंदकुमार आनंदराव वळंजू, तर अपक्ष म्हणून निहाल फिरोज खान, अखिल भारतीय हिंदू महासभेकडून सचिन मारुती सोनटक्के निवडणूक रिंगणात आहेत. वळंजू सन १९९५ ते २००० मध्ये जुना राजवाडा प्रभागातून नगरसेवक होते. २००० ते २००५ अखेर शास्त्रीनगर-जवाहरनगर प्रभागातून ते नगरसेवक होते. २००० साली त्यांना महापौरपदावर काम करण्याची संधी मिळाली. वीस महिने ते महापौरपदावर होते. याशिवाय कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत. नगरसेवक, महापौर, बाजार समितीचे संचालक म्हणून अनेक वर्षे काम केले असल्यामुळे ही निवडणूक माझ्यासाठी जिंकण्यासाठी सोपी आहे, असा त्यांचा दावा आहे. यावेळी ते ताराराणी आघाडीकडून निवडणूक लढवीत आहेत. अनेक निवडणूक लढविण्याचा आणि जिंकण्याचा त्यांना अनुभव आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी आमदार महाडिक यांची रसद मिळणार आहे. त्यामुळे विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. काँग्रेसकडून रिंगणात असलेले कांबळे हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये वाहक म्हणून कार्यरत होते. समाजकारण आणि राजकारण यामध्ये रस असल्यामुळे सन २००० मध्ये वाहकपदाचा राजीनामा देऊन पहिल्यांदाच महापालिका निवडणूक रिंंगणात उतरले; पण यश मिळाले नाही. सातत्याने समाजकारणात सक्रिय राहिले. प्रभागातील लोकांच्या अडचणी समजावून घेणे, मदतीला धावून जाणे असा त्यांचा स्वभाव आहे. प्रभागात त्यांचा संपर्कही चांगला आहे. काँग्रेससोबत असणाऱ्या पारंपरिक मतदारांची संख्या प्रभागात आहे. वळंजू यांच्याबद्दल नाराजी आहे. त्यामुळे यावेळी मला संधी आहे, असे कांबळे यांचे म्हणणे आहे.राष्ट्रवादीकडून शादाब अत्तार रिंगणात आहेत. पक्षाच्या माध्यमातून त्यांचाही संपर्क चांगला आहे. प्रभागात मुस्लिम समाजाची मते निर्णायक आहेत. अत्तार हे मुस्लिम समाजाचे असल्यामुळे फायदा होणार आहे. महापौर वळंजू यांच्या विरोधात अत्तार यांना निवडून आणण्यासाठी अत्तार यांच्यासाठी पक्षानेही ताकद लावली आहे. शिवसेनेकडून नियाज खान रिंगणात आहेत. तेही मुस्लिम समाजाचेच आहेत. त्यामुळे अत्तार आणि नियाज यांच्यात समाजाची मते मिळवण्यासाठी रस्सीखेच होणार आहे. प्रभागात शिवसेनेचीही ताकद आहे, त्याचाही फायदा नियाज यांना होणार आहे. अपक्ष म्हणून निहाल खानही लढत आहेत. मुस्लिम समाजाचे तीन उमेदवार आहेत. त्यामुळे या समाजाची मतांमध्ये विभागणी होणार आहे. रिंगणातील सर्वच उमेदवार मीच निवडून येणार, असा दावा करीत आहेत. बिग फाईटप्रभागात ४ हजार २०० मतदार आहेत. मुस्लिम ४५०, ढोर ३५०, मराठा ९००, डोंबारी ६५०, वीरशैव कक्कय्या ७५०, ब्राह्मण ६०० असे सर्वसाधारपणे मतदार आहेत. झोपडपट्टीत साडेसातशे मतदार आहेत. तेथे शेवटच्या टप्प्यात पैसे वाटप करून गठ्ठा मतदानासाठी ताकद लावली जाते.