शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

आयटी इंडस्ट्रीजसाठी कोल्हापुरात पोषक वातावरण : ओंकार देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 16:42 IST

जागतिक पातळीवरील आयटी इंडस्ट्रीजमध्ये कोल्हापूरची ओळख निर्माण होईल, असा विश्वास आयटी असोसिएशन आॅफ कोल्हापूरचे अध्यक्ष ओंकार देशपांडे यांनी बुधवारी येथे व्यक्त केला.

ठळक मुद्देआयटी इंडस्ट्रीजसाठी कोल्हापुरात पोषक वातावरण : ओंकार देशपांडे‘आयटी असोसिएशन’च्या पदाधिकाऱ्यांची ‘लोकमत’ला सदिच्छा भेट

कोल्हापूर : उद्यमशीलता, नवनिर्मितीची कौशल्ये असलेले मनुष्यबळ, नैसर्गिक अनुकूलता आणि बंगलोर, गोवा, हैदराबाद यांच्याशी असलेल्या दळणवळणाच्या संलग्नतेमुळे देशातील आयटी इंडस्ट्रीजच्या वाढीसाठी कोल्हापुरात पोषक वातावरण आहे. आयटी पार्क, नियमित विमानसेवा, आदी पायाभूत सुविधांची पूर्तता लवकर झाल्यास जागतिक पातळीवरील आयटी इंडस्ट्रीजमध्ये कोल्हापूरची ओळख निर्माण होईल, असा विश्वास आयटी असोसिएशन आॅफ कोल्हापूरचे अध्यक्ष ओंकार देशपांडे यांनी बुधवारी येथे व्यक्त केला.‘लोकमत’च्या शहर कार्यालयास असोसिएशनचे अध्यक्ष ओंकार देशपांडे, सचिव प्रसन्न कुलकर्णी, समिती सदस्य प्रकाश पुणेकर यांनी सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अध्यक्ष देशपांडे म्हणाले, आयटी असोसिएशन आॅफ कोल्हापूर गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत आहे.

असोसिएशनचे ५७ सदस्य आहेत. कोल्हापूरमध्ये अँड्राईड, डॉटनेट अशा सर्व तंत्रज्ञानावर काम चालते. येथील आयटी इंडस्ट्रीजवर सुमारे ७०० कुटुंबांचा उदरनिर्वाह चालत असून, वार्षिक उलाढाल सुमारे ६० कोटींपर्यंत आहे. या ठिकाणी कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आहे.

नैसर्गिक वातावरण चांगले आहे. या सर्व बाबींचा विचार करता पुणे, हिंजवडीनंतर आता कोल्हापूर हे आयटी इंडस्ट्रीजचा विकास आणि वाढीसाठी पोषक शहर आहे. ते लक्षात घेऊन येथे पायाभूत सुविधांची पूर्तता करण्याची आणि जागतिक पातळीवरील काही आयटी कंपन्या कोल्हापूरमध्ये येण्याबाबत सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.

महानगरपालिकेकडून जागा हस्तांतरित व्हावीस्थानिक आयटी इंडस्ट्रीजच्या वाढीसाठी असोसिएशनने कोल्हापूर आयटी पार्कच्या निर्मितीसाठी पुढाकार घेऊन महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला. त्यावर गेल्या चार वर्षांपूर्वी महानगरपालिकेने टेंबलाईवाडी परिसरात सव्वातीन एकर जागा आयटी पार्कसाठी आरक्षित केली आहे. ही जागा पुढील कार्यवाहीसाठी असोसिएशनकडे लवकर हस्तांतरित होणे आवश्यक असल्याचे अध्यक्ष देशपांडे यांनी सांगितले.

‘लोकमत’ने पाठबळ द्यावेकोल्हापूरच्या विविध प्रश्नांवर ‘लोकमत’ने सातत्याने आवाज उठविला आहे. चांगल्या उपक्रमांना बळ दिले आहे. कोल्हापुरातील आयटी इंडस्ट्रीजच्या विकासासाठी असोसिएशनकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना ‘लोकमत’ने पाठबळ द्यावे, अशी अपेक्षा अध्यक्ष देशपांडे यांनी व्यक्त केली. त्यावर संपादक वसंत भोसले म्हणाले, कोल्हापूरमध्ये आयटी इंडस्ट्रीजच्या विकासाची मोठी संधी आहे. त्यासाठी असोसिएशनची भूमिका सरकारदरबारी आणि समाजापर्यंत ‘लोकमत’ निश्चितपणे पोहोचवेल.

 

 

टॅग्स :Lokmatलोकमतkolhapurकोल्हापूर