शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

राष्ट्रवादीला नडले सोयीचे राजकारण

By admin | Updated: October 21, 2014 00:21 IST

आठपैकी चार उमेदवारांची डिपॉझीट जप्त झाली, एवढी नामुष्की पक्षावर

राजाराम लोंढे - कोल्हापूर -लोकसभा निवडणुकीतील विजयाने आत्मविश्वास दुणावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभा निवडणुकीत पुरती पीछेहाट झाली. गेली पंधरा वर्षे जिल्ह्याला लाल दिवा अखंडपणे देणाऱ्या राष्ट्रवादीला सर्व मतदारसंघांत उमेदवार उभे करता आले नाहीत. आठपैकी चार उमेदवारांची डिपॉझीट जप्त झाली, एवढी नामुष्की पक्षावर ओढवली. नेत्यांच्या सोयीचे राजकारण केल्याने बालेकिल्ल्यातच पक्षाला मोठा फटका बसला. गेल्या पाच वर्षांत नेत्यांनी आपले मतदारसंघ सोडून इतरत्र लक्ष न दिल्याने पक्षाची वाताहात झाली. परिणामी लोकसभा निवडणुकीत ‘हातकणंगले’ची जागा काँग्रेसला सोडावी लागली. कोल्हापूरची जागा जिंकताना सर्वांच्या नाकात दम आला. त्यातून स्थानिक नेत्यांनी फारसा बोध घेतला नाही. दहा वर्षांची आघाडी कायम राहू शकते, या भ्रमात जिल्ह्यातील नेते होते; पण ऐनवेळी आघाडी तुटली आणि नेत्यांची भंबेरी उडाली. दहाही जागा लढविण्याची वल्गना करणारे उघड्यावर पडले. कसेबसे आठ जागांवर उमेदवार देता आले. तेही देताना पक्षापेक्षा स्वत:ची राजकीय सोय बघितल्याने तेथे पक्षाची अक्षरश: वाताहात झाली. करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले या तालुक्यांत पक्षाची ताकद फारशी नाही. या तालुक्यातील कार्यकर्त्यांना बळ देण्याऐवजी नेत्यांनी आपलेच मतदारसंघ अधिक सुरक्षित केले. ‘करवीर’मधून अनपेक्षितपणे माघार घेऊन जिल्हाध्यक्षांनी आपला मतदारसंघ सुरक्षित केला; पण तेच अडचणीत आले. ‘शिरोळ’मध्ये माने व यड्रावकर यांच्यातील उमेदवारीचा वाद मिटला नाही. इचलकरंजीमध्येही तीच परिस्थिती राहिली. हातकणंगले व शाहूवाडीत मैत्रीला जागण्यासाठी कमकुवत उमेदवार दिले. कोल्हापूर महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. पक्षाचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांना उमेदवारी दिली. ‘उत्तर’मध्ये पक्षाच्या महापौरांसह सुमारे २२ नगरसेवक येतात. यापैकी बहुतांशी नगरसेवक अन्य पक्षाच्या व्यासपीठावर उघड होते; पण नंतर पोवार यांनी तक्रार केल्यानंतर रॅलीत सहभागी झाले. पण, त्याचे मतात रूपांतर झाले नाही. पोवार यांना अवघी ९८८७ इतकी मते मिळाली. यावरून नेत्यांच्या राजकीय खेळ्या स्पष्ट होतात. याला स्थानिक नेत्यांचे सोयीचे राजकारणच कारणीभूत ठरले आहे.वजाबाकीचे राजकारणगेले पाच वर्षांत पक्षात नवीन आलेले व पक्ष सोडून गेलेल्यांची संख्या पाहिली, तर पक्षाची कामगिरी लक्षात येते. धनंजय महाडिक (एकटेच) राष्ट्रवादीत आले, पण पाच वर्षांत अनेक चांगली माणसे पक्षातून बाजूला गेली. काहीजण सध्या काठावर आहेत. त्यामुळे नेत्यांनी बेरजेपेक्षा वजाबाकीचे राजकारण सुरू केल्याने पक्षाला भविष्यात मोठी किंमत मोजावी लागणार हे निश्चित आहे.