शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

राष्ट्रीय मतदार दिन : वर्षात २८ हजार मतदार वाढले, ई ईपीक प्रणाली कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 15:06 IST

National Voters' Day Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या सव्वा वर्षात २८ हजार ८६३ इतके मतदार वाढले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांची आकडेवारी ३० लाख ९३ हजार ४३ इतकी होती. वर्षभरात ही संख्या ३१ लाख २१ हजार ९०६ इतकी झाली आहे. यात १६ लाख ५३८ पुरुष तर १५ लाख २१ हजार २९० महिला आहेत.

ठळक मुद्देवर्षात २८ हजार मतदार वाढलेई ईपीक प्रणाली कार्यान्वित : राष्ट्रीय मतदार दिन साजरा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या सव्वा वर्षात २८ हजार ८६३ इतके मतदार वाढले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांची आकडेवारी ३० लाख ९३ हजार ४३ इतकी होती. वर्षभरात ही संख्या ३१ लाख २१ हजार ९०६ इतकी झाली आहे. यात १६ लाख ५३८ पुरुष तर १५ लाख २१ हजार २९० महिला आहेत.

निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून ई ईपीक प्रणाली कार्यान्वित केली आहे. याअंतर्गत मतदार यादीत मतदारांच्या नावापुढे त्यांचा मोबाइल नंबर असल्यास त्यांना ई-मतदार ओळखपत्र मोबाइलवर डाऊनलोड करता येईल व ते मतदानासाठी ग्राह्य धरले जाईल.दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क बजावून नवभारत घडविण्यासाठी मतदारांनी मतदानास पुढे यावे, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी लोकसभा, विधानसभा, पदवीधरच्या निवडणुका असोत किंवा ग्रामपंचायत सर्वच निवडणुकांमध्ये मतदानात कोल्हापूर अग्रेसर असल्याचे गौरवोद्‌गार काढले.यावेळी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार शीतल मुळे-भांबरे, शाहीर आझाद नायकवडी यांच्यासह अधिकारी-कर्मचारी व नवमतदार उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना शपथ दिली.डॉ. बलकवडे यांनी लोकशाहीने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे, असे आवाहन केले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी प्रास्ताविक केले. दिव्यांग मतदार, नवमतदारांना मतदान ओळखपत्र मतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या ब्रेल लिपी, निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. निवडणूक साक्षरतेमध्ये उल्‍लेखनीय काम केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.--

टॅग्स :Votingमतदानkolhapurकोल्हापूर