शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात आढळला पॅराग्वे देशाच्या राष्ट्रवृक्ष "पर्पल-पिंक ट्रम्पेट"

By संदीप आडनाईक | Updated: January 4, 2024 13:39 IST

कोल्हापूर : विविध वृक्षांचा अभ्यास करताना वनस्पतीतज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर आणि वृक्षप्रेमी परितोष उरकुडे यांना कोल्हापूरात "पॅराग्वे" या देशाचा ...

कोल्हापूर : विविध वृक्षांचा अभ्यास करताना वनस्पतीतज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर आणि वृक्षप्रेमी परितोष उरकुडे यांना कोल्हापूरात "पॅराग्वे" या देशाचा "राष्ट्रवृक्ष " म्हणून बहुमान" मिळालेला "पर्पल-पिंक ट्रम्पेट" वृक्ष आढळला. कोल्हापूर जिल्हयाच्या वनस्पतीकोशात या वृक्षाची शास्त्रीय नोंद नव्हती. त्याची नोंद रितसर करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. बाचूळकर यांनी दिली.आयसोलेशन हॉस्पिटल परिसरात जांभळट-गुलाबी रंगाच्या फुलांनी बहरलेला, मध्यम उंचीचा, आकर्षक वृक्ष डॉ. बाचूळकर आणि वृक्षप्रेमी उरकुडे यांना आढळला. डॉ. बाचूळकर यांनी हा वृक्ष पूर्वी कर्नाटकातील बेळगांव आणि बेंगळूर शहरातील बागांमध्ये पाहिला होता, यामुळे त्यांना याची ओळख लगेच पटली. संदर्भ ग्रंथ पाहिल्यानंतर संबंधित वृक्ष हा "पर्पल-पिंक ट्रम्पेट" असल्याचेच स्पष्ट झाले. डॉ. बाचूळकरांना हा वृक्ष यापूर्वी हातकणंगले तालुक्यातील रामलिंग रस्त्यावर असणाऱ्या भिडे फार्म हाऊसच्या बागेतही आढळला होता."टेटू" च्या कुळातील वृक्षपर्पल-पिंक ट्रम्पेट वृक्षाचे शास्त्रीय नाव "हॅन्ड्रोॲन्यस इम्पेटी जिनोसस्"असे असून, हा वृक्ष "बिस्तोनिमूसी" म्हणजेच, "टेटू" च्या कुळातील आहे. हा वृक्ष विदेशी असून, याचे मुळस्थान दक्षिण आणि उत्तर अमेरिका खंडात आहे. या खंडातील बहुतांश देशांत हे वृक्ष नैसर्गिकपणे वनक्षेत्रात आढळतात. या वृक्षाला पॅराग्वे देशाच्या राष्ट्रवृक्ष म्हणून बहुमान मिळाला आहे. या वृक्षांची अनेक देशांत बागांमध्ये लागवड केलेली आहे.

तुतारीच्या आकाराचे मुखपर्पल-पिंक ट्रम्पेट हा पर्णझडी वृक्ष ८ ते १० मीटर उंच वाढतो. ते काहीवेळा २५ मीटर उंचीपर्यंत वाढतात. फांद्या अनेक, पसरणाऱ्या असून, पाने संयुक्त हस्ताकृती आणि समोरासमोर असतात. प्रत्येक पानांत पाच पर्णिका असून, त्या लंबगोलाकार असतात. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पानगळ होऊन डिसेंबर-जानेवारीत फुलांना बहार येतो. फुलांमध्ये पाच पाकळ्या एकमेकास चिकटलेल्या असून, तुतारीच्या आकाराची पुष्पनळी तयार होते. त्याचे मुख पिवळसर असते.

छाटकलम पध्दतीने या वृक्षाची रोपे तयार करता येतात. याला मराठीत नाव नाही, पण याला "जांभळट-गुलाबी तुतारी" म्हणू शकतो. -डॉ. मधुकर बाचूळकर, वनस्पती शास्त्रज्ञ.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर