शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्ग विभाग : नवे अधिकारी अ. ल. भोसले यांच्याकडे कार्यभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 12:14 IST

राष्ट्रीय महामार्ग, कोल्हापूर विभागाच्या कार्यकारी अभियंतापदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविलेले वाय. जी. लवटे यांनी तो नाकारला. त्यांच्या जागी सोलापूर उपविभागातील उपअभियंता अ. ल. भोसले यांच्याकडे हा कार्यभार सोपविल्याचे आदेश गुरुवारी सायंकाळी सहायक मुख्य अभियंता स. रा. पुरी यांनी दिले.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्ग विभाग : नवे अधिकारी अ. ल. भोसले यांच्याकडे कार्यभारलवटे यांनी नाकारला; शिवाजी पुलाच्या कामाला येणार गती

कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्ग, कोल्हापूर विभागाच्या कार्यकारी अभियंतापदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविलेले वाय. जी. लवटे यांनी तो नाकारला. त्यांच्या जागी सोलापूर उपविभागातील उपअभियंता अ. ल. भोसले यांच्याकडे हा कार्यभार सोपविल्याचे आदेश गुरुवारी सायंकाळी सहायक मुख्य अभियंता स. रा. पुरी यांनी दिले. त्यामुळे पर्यायी शिवाजी पुलाच्या कामाचे काम आता भोसले यांच्या नियंत्रणाखाली होणार असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, भोसले हे सोमवारी (दि. ११) हा नवा कार्यभार स्वीकारणार आहेत.पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामाचा प्रश्न भलताच गाजत आहे. हे पुलाचे काम पूर्णत्वाकडे जात असताना अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत; पण या पुलाप्रश्नी प्रारंभपासून वादग्रस्त बनलेले व कृती समितीने बदलीची मागणी केलेले उपअभियंता संपत आबदार मात्र आहे त्याच ठिकाणी राहिले; तर पुलाच्या कामाला गती दिलेले कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे यांची पुणे येथे बदली झाली. त्यांच्या ठिकाणी सोलापूर उपविभागातील कार्यकारी अभियंता वाय. जी. लवटे यांच्याकडे अतिरिक्त पदभार दिला होता.दरम्यान, लवटे हे दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात येऊन येथील परिस्थितीची पाहणी करून गेले; पण त्यानंतर वैयक्तिक अडचण पुढे करून कोल्हापुरातील कार्यभार स्वीकारणार नसल्याचे वरिष्ठ कार्यालयास पत्राद्वारे कळविले.

त्यामुळे पर्यायी शिवाजी पुलाच्या कामांसाठी सक्षम अधिकाऱ्याकडे कार्यभार सुपूर्द करणे आवश्यक आहे. त्यामुळे राष्ट्रीय  महामार्ग विभाग, सोलापूर उपविभागातील उपअभियंता अ. ल. भोसले यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात येत असल्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याबाबतचा आदेश कोकण भवनचे सहायक मुख्य अभियंता स. रा. पुरी यांनी सायंकाळी दिले. 

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागkolhapurकोल्हापूर