शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

‘चेतना’च्या मुलांसोबत बीग बींचे ‘साईन लँग्वेज’मध्ये राष्ट्रगीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : येथील चेतना अपंगमती विकास संस्थेतील मुलांसोबत अमिताभ बच्चन यांनी सांकेतिक भाषेत (साईन लँग्वेज) राष्टÑगीत सादर केले. त्याची चित्रफीत तयार करण्यात आली असून त्याचे प्रकाशन देशात विविध ठिकाणी होत आहे.‘वुई केअर फिल्म फेस्ट व ब्रदरहुड’ या दिल्लीस्थित स्वयंसेवी संस्थांनी या चित्रफितीसाठी पुढाकार घेतला असून त्यामध्ये मुंबई आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : येथील चेतना अपंगमती विकास संस्थेतील मुलांसोबत अमिताभ बच्चन यांनी सांकेतिक भाषेत (साईन लँग्वेज) राष्टÑगीत सादर केले. त्याची चित्रफीत तयार करण्यात आली असून त्याचे प्रकाशन देशात विविध ठिकाणी होत आहे.‘वुई केअर फिल्म फेस्ट व ब्रदरहुड’ या दिल्लीस्थित स्वयंसेवी संस्थांनी या चित्रफितीसाठी पुढाकार घेतला असून त्यामध्ये मुंबई आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नरेश बगरे आणि कार्याध्यक्ष प्राचार्य पवन खेबूडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांत तयार करण्यात आलेल्या ध्वनिचित्रफितीचे प्रकाशन नवी दिल्ली येथे उद्या, गुरुवारी मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते, तर कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहात रविवारी (दि. १३) सकाळी १० वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते व महापौर हसिना फरास यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.खेबुडकर म्हणाले, वुई केअर फिल्म फेस्ट व ब्रदरहूड या स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने ही ध्वनीचित्रफितीची निर्मिती झाली आहे.दोन वर्षांपूर्वी कोल्हापुरात ‘चेतना’च्या महोत्सवात सर्व विकलांग मुलांसोबत अमिताभ बच्चन यांनी सांकेतिक भाषेत राष्ट्रगीत सादर करावे व चित्रफीत तयार करावी, असा विचार पुढे आला होता. त्याला मूर्त रूप आले आहे. पत्रकार परिषदेस, उपाध्यक्ष डॉ. सुनील पाटील, कोषाध्यक्ष श्रीराम भिसे हेही उपस्थित होते.चित्रफीत निर्मितीत सहभाग१या चित्रफीत निर्मितीत कोल्हापूरच्या चेतना संस्थेचे आठ विद्यार्थी याशिवाय नवी दिल्लीतील कर्सन्ड अ‍ॅक्शन, स्वयं ग्लोबल सेंटर फॉर इन्क्लुझिव्ह एन्व्हायरमेंट, सामाजिक न्याय मंत्रालय, मध्यप्रदेश, आरूषी, भोपाळ, एपीजे सत्य युनिव्हर्सिटी, गुडगाव या संस्थांचा सहभाग आहे.२राष्टÑगीतात ‘चेतना’तील मुलांबरोबर अ‍ॅडॅप्ट (मुंबई), हेलन केलर इन्स्टिट्यूट फॉर दि डेफ ब्लार्ईंड (मुंबई), कमला मेहता दादर स्कूल फॉर दि ब्लार्इंड (मुंबई), नवी दिल्लीतील कीर्ती कालरा व सिमरन कालरा येथील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.३चेतना संस्थेतील सुशांत शिंदे, वन्या करकरे, निखिल डाफळे, अनिशा सुतार, विशाल मोरे, आम्रपाली कांबळे, विनम्र खटावकर, प्रतीक्षा कराळे अशा ८ मुलांचा सहभाग आहे. चित्रफीत निर्मितीसाठी (कै.) आदेश श्रीवास्तव यांचे संगीत असून गोविंद निहलानी यांनी दिग्दर्शन केले.