शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेत वादग्रस्त ठरलेल्या २१८.५५ कोटी रुपये खर्चाच्या रस्ते विकास कामांना अखेर हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 13:52 IST

२१८ कोटींच्या निविदा प्रसिद्ध : मार्चच्या आतच कार्यादेश निघण्याची शक्यता

ठळक मुद्दे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या सुधारित अंदाजपत्रकात सदर रस्ते विकास कामांच्या खर्चाची तरतूद करण्यात सत्ताधारी भाजपाने बाजी मारली असून त्यामुळे स्पील ओव्हरही वाढणार आहेअंदाजपत्रकात तरतूद नसताना रस्ते विकासाचा हा घाट घातल्याबद्दल शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि माजी उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी सर्वप्रथम थेट लेखी पत्र देत या प्रकाराला विरोध दर्शविला होता

नाशिक - मागील दाराने जादा विषयांच्या माध्यमातून सुमारे २५७ कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामांना मंजुरी दिल्याचे प्रकरण वादात अडकले असतानाच महापालिकेच्या बांधकाम विभागाने २१८.५५ कोटी रुपये खर्चाच्या कामांची निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. ७ फेबु्वारीला निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चालू आर्थिक वर्षातच मार्च अखेर ठेकेदारांच्या हाती कार्यादेश पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या सुधारित अंदाजपत्रकात सदर रस्ते विकास कामांच्या खर्चाची तरतूद करण्यात सत्ताधारी भाजपाने बाजी मारली असून त्यामुळे स्पील ओव्हरही वाढणार आहे.शहरात गेल्या तीन वर्षांत रस्त्यांच्या कामांवर सुमारे सातशे कोटी रुपये खर्च करणा-या महापालिकेत मागील वर्षी सत्तेत आलेल्या भाजपाने २५७ कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामांचा घाट घातला. महापालिकेच्या नाजूक परिस्थितीचे दाखले देणा-या आयुक्तांकडूनही सत्ताधारी भाजपाला साथ लाभली आणि मागील दाराने जादा विषयांच्या माध्यमातून २५७ कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. अंदाजपत्रकात तरतूद नसताना रस्ते विकासाचा हा घाट घातल्याबद्दल शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि माजी उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी सर्वप्रथम थेट लेखी पत्र देत या प्रकाराला विरोध दर्शविला होता. त्यापाठोपाठ भाजपाचेच नगरसेवक कमलेश बोडके यांनीही घरचा अहेर देत विरोधाची भूमिका घेतली होती. कॉँग्रेस-राष्टवादीही या विरोधात सहभागी झाली तर शिवसेनेची भूमिका संदिग्ध राहिली. महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी व मुख्य लेखापरीक्षक यांनी या कामांबाबत निधी उपलब्ध करुन देता येणार नसल्याचे म्हटले होते. दरम्यान, चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात या कामांचा समावेश राहणार नसल्याचे ठामपणे सांगत आयुक्तांनी पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकातच त्याची तरतूद होणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, आता सुधारित अंदाजपत्रकात या कामांसाठी तरतूद करण्यात येत असून मार्चअखेर पर्यंत कार्यादेश निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे एप्रिलपासून प्रत्यक्ष रस्त्यांवर डांबर पडण्यास सुरूवात होणार आहे.एमआयडीसी भागातही रस्तेमहापालिकेने एमआयडीसी परिसरातीलही रस्त्यांच्या कामांचा समावेश केला आहे. एमआयडीसी परिसरातील रस्त्यांच्या कामांबाबत उद्योजकांकडून सातत्याने मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवरच एमआयडीसी परिसरात ८.८६ कोटी रुपये खर्चाची रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. प्रभाग ११ ला दुहेरी लाभ होणार असून प्रभागातील रस्त्यांसाठीही ६.२६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागाला ७.५० कोटी रुपये याप्रमाणे रस्ते विकासाचा निधी मिळणार असून एप्रिलपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती शहर अभियंता उत्तम पवार यांनी दिली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका