शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

चंदगडमध्ये नंदिनी बाभूळकर यांचा ‘गाव टू गाव’ संपर्कदौरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 00:25 IST

गडहिंग्लज : खासदार धनंजय महाडिक यांच्या विजयासाठी युवा नेत्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी अक्षरश: आपल्या पायाला भिंगरी बांधली आहे. ...

गडहिंग्लज : खासदार धनंजय महाडिक यांच्या विजयासाठी युवा नेत्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी अक्षरश: आपल्या पायाला भिंगरी बांधली आहे. १५ दिवसांत तब्बल १३३ गावांचा संपर्क दौरा त्यांनीपूर्ण केला. मोदी सरकारच्या कामगिरीवर जोरदार हल्लाबोल करीत लोकशाही वाचविण्यासाठी काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडीला विजयी करण्याचे आवाहन त्या करीत आहेत.गेल्या पाच वर्षांत संपूर्णर्देशात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दलित, अल्पसंख्याक व महिलांवरील वाढते अत्याचार, गगनाला भिडलेली महागाई, बेरोजगारी, नोटाबंदी व ‘जीएसटी’मुळे व्यापारी व सर्वसामान्य ग्राहकांची झालेली आर्थिक कोंडी या मुद्द्यांवरच त्यांनी प्रचारात भर दिला आहे.गडहिंग्लज तालुक्यातील शेंद्री येथून त्यांनी या मोहिमेला सुरुवात केली. गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांतील वाड्या-वस्त्यांवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह संपर्कदौरा सुरू आहे. दरम्यान, कानडेवाडी, किणे, बसर्गे व पाटणे फाटा येथे त्यांनी प्रचारसभाही घेतल्या. आठवडाभरात दौरा पूर्ण करून जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय मेळावे घेण्याचे नियोजन केल्याचे सांगण्यात आले.कोण आहेत नंदाताई..?डॉ. नंदिनी बाभूळकर तथा नंदाताई या विधानसभेचे माजी अध्यक्षस्व. बाबासाहेब कुपेकर व विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्याकन्या होत. बाबांच्या आकस्मिक निधनानंतर झालेल्या ‘चंदगड’च्या पोटनिवडणुकीसह सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराची सूत्रे त्यांनीएकहाती सांभाळली. ‘एव्हीएच’ कंपनीच्या विरोधातील यशस्वी लढ्यामुळे त्यांचे नाव देशभर पोहोचले आहे.