शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

बंडाळी रोखण्यासाठी शेवटपर्यंत नावे गुलदस्त्यात राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 13:37 IST

Gokul Milk Elecation Kolhapur-गोकुळसाठी विरोधी आघाडीकडे इच्छुकांची मांदियाळी असल्याने नेत्यांची डोकेदुखी ठरणार हे निश्चित आहे. उमेदवारी नाकारल्यानंतर बंडाळी होणार, ते टाळण्यासाठी माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत पॅनेल गुलदस्त्यात ठेवण्याची व्यूहरचना विरोधी आघाडीच्या नेत्यांची आहे. पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह मंत्री पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके व विश्वास पाटील यांचीही रविवारी बैठक झाली.

ठळक मुद्देबंडाळी रोखण्यासाठी शेवटपर्यंत नावे गुलदस्त्यात राहणारसतेज पाटील, संजय मंडलिक, आबिटकरांची बैठक

कोल्हापूर :गोकुळसाठी विरोधी आघाडीकडे इच्छुकांची मांदियाळी असल्याने नेत्यांची डोकेदुखी ठरणार हे निश्चित आहे. उमेदवारी नाकारल्यानंतर बंडाळी होणार, ते टाळण्यासाठी माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत पॅनेल गुलदस्त्यात ठेवण्याची व्यूहरचना विरोधी आघाडीच्या नेत्यांची आहे. पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह मंत्री पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके व विश्वास पाटील यांचीही रविवारी बैठक झाली.खासदार संजय मंडलिक हे संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने ह्यगोकुळह्णच्या चर्चेत सहभागी नव्हते. ते शनिवारी रात्री कोल्हापुरात आल्यानंतर घडामोडींनी वेग घेतला. रविवारी दुपारी मंत्री पाटील, खासदार मंडलिक व आमदार आबिटकर यांची बैठक झाली. यामध्ये एकूण पॅनेलची रचना, कोणाला किती जागा द्याव्या लागतील, यासह इतर महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा झाली.

विरोधी आघाडीकडे इच्छुकांची संख्या अधिक असल्याने नाराजांची संख्याही वाढणार आहे. ती थोपविताना नेत्यांची दमछाक होणार आहे. ते टाळून विरोधाची धार कमी करायची झाल्यास पॅनेल शेवटपर्यंत गुलदस्त्यात ठेवावे, असा मतप्रवाह पुढे आला आहे. माघारीच्या शेवटच्या क्षणी पॅनेल जाहीर केल्याने इच्छुक इतरांच्या हाताला लागणार नाहीत, त्यामुळे बंडाळी शमविण्यात यश येईल, अशी अटकळ विरोधी आघाडीच्या नेत्यांची आहे.दरम्यान, रविवारी सकाळी मंत्री सतेज पाटील, चंद्रदीप नरके व विश्वास पाटील यांची करवीर तालुक्यातील जागा वाटपाबाबत बैठक झाली. येथे विश्वास पाटील व नरके यांनी दोन जागांवर आग्रह धरल्याचे समजते. करवीरला पाच जागा मिळणार असून, त्यामध्ये विश्वास पाटील, शशिकांत पाटील-चुयेकर, बाबासाहेब चौगुले यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. चौथी जागा शेकापला मिळू शकते. पाचवी जागा मंत्री पाटील ह्यदक्षिणह्णमध्ये टाकू शकतात. 

टॅग्स :Gokul MilkगोकुळElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर