शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

अडीच वर्षे झाली तरीही जात नाही वस्त्या, रस्त्यांची ‘जात’; कोल्हापूर जिल्ह्यात एकाही नावात बदल नाही

By समीर देशपांडे | Updated: July 11, 2023 12:08 IST

राज्यातील अनेक शहरांमधील आणि गावांची, वस्त्यांची आणि रस्त्यांची नावे ही जातिवाचक

समीर देशपांडेकोल्हापूर: पुरोगामी महाराष्ट्रातील जातिवाचक गावांची, रस्त्यांची आणि वस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय २०२० साली घेण्यात आला. त्यानुसार शासन आदेश निघाला. परंतु गेल्या अडीच वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यातील एकाही अशा नाव बदलण्याच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिलेली नाही. राज्यभरही अशीच परिस्थिती असण्याची शक्यता असून पूर्तताच होणार नसेल तर शासन आदेश काढतेच कशाला अशी विचारणा होत आहे.राज्यातील अनेक शहरांमधील आणि गावांची, वस्त्यांची आणि रस्त्यांची नावे ही जातिवाचक आहे. पूर्वीच्या काळी ज्या गल्लीत ज्या समाजाचे ग्रामस्थ राहतात तेच नाव गल्लीला दिले जायचे. परंतु सामाजिक सलोखा वाढावा यासाठी अशी नावे बदलून त्याऐवजी महापुरुषांची आणि लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला. ११ डिसेंबर २०२० रोजी याचा शासन आदेशही काढण्यात आला. यानंतर नगरविकास आणि ग्रामविकास विभागाने स्वतंत्र आदेश काढून याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

अशी होती नाव बदलण्याची पद्धत

  • एखाद्या वस्तीचे, रस्त्याचे जातिवाचक नाव बदलावयाचे असल्यास ग्रामसभेने तसा ठराव करून तो गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर करावा.
  • गटविकास अधिकारी यांनी हा प्रस्ताव तपासून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवावा. त्यांनी तो तपासून विभागीय आयुक्तांच्या मार्फत शासनाकडे मान्यतेसाठी पाठवावा.
  • शासन स्तरावर प्राप्त प्रस्तावाची तपासणी करून मंत्री महोदयांच्या मान्यतेने त्यावर कार्यवाही केली जाईल.

कोल्हापूर जिल्ह्यातील स्थितीतालुका - प्रस्ताव सादरकरवीर १९२कागल १६५शाहूवाडी १३७पन्हाळा १२०हातकणंगले ९९आजरा ९२भुदरगड ४०चंदगड ३६गडहिंग्लज ३०गगनबावडा २८राधानगरी २५शिरोळ १०पुन्हा मुंडे आलेत बघुया

२०२० साली हा शासन आदेश काढताना धनंजय मुंडे हे सामाजिक न्यायमंत्री होते. आता ते पुन्हा सत्तेत आले आहेत. त्यांनाच सामाजिक न्याय खाते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसे झाल्यास ते आपल्या काळच्या आदेशाच्या अंमलबजावणीमध्ये लक्ष घालतील अशी अपेक्षा आहे.

लवकर अंमलबजावणी कराशासनाने काढलेल्या या आदेशानुसार प्रशासनाने याची लवकर अंमलबजावणी करण्याची गरज आहे. ही प्रक्रिया किमान नवीन मंत्र्यांनी तातडीने राबवावी. - किरण कांबळे, माजी नगरसेवक, आजरा

टॅग्स :kolhapurकोल्हापूर