शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गोगवेच्या क्रीडासंकुलास शहीद सावन माने यांचे नाव

By admin | Updated: June 27, 2017 01:15 IST

पालकमंत्र्यांची ग्वाही : माने यांच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन; राज्य शासनाकडून आठ लाखांची मदत देणार

लोकमत न्यूज नेटवर्क--बांबवडे/कोल्हापूर : भारतीय सीमेचे रक्षण करताना धारातीर्थी पडलेल्या शहीद जवान सावन माने यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गोगवे (ता. शाहूवाडी) येथील प्रस्तावित शासकीय क्रीडासंकुलास शहीद सावन माने यांचे नाव देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी येथे दिली. त्यांनी शहीद माने यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करीत राज्य शासनातर्फे आठ लाखांची मदत देण्यात येईल, असे सांगितले.गोगवे (ता. शाहूवाडी) येथील शहीद जवान सावन माने यांच्या घरी दुपारी पालकमंत्री पाटील यांनी भेट देऊन वडील बाळकू माने, भाऊ सागर माने यांच्यासह कुटुंबीयांचे सांत्वन केले.त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात महाराष्ट्र शासन सहभागी असून, शासन पूर्णपणे त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही यावेळी पालकमंत्र्यांनी दिली. राज्य शासनाच्या वतीने शहीद जवान माने यांच्या कुटुंबीयांना आठ लाखांची मदत प्राधान्याने दिली जाईल. याबरोबरच केंद्र सरकारची १० लाखांची मदत मिळेल. त्यासाठीचे प्रस्ताव पन्हाळा प्रांताधिकारी अजय पवार यांनी तत्काळ तयार करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या सैनिकांसाठी असणाऱ्या विमा योजनेतून २४ लाख रुपयांची मदतही मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.जमीन देण्यासाठी प्रयत्नशीलशहीद सावन माने यांचे वडील सैन्यात सेवा बजावून निवृत्त झाले आहेत. त्यांचे भाऊ सागर माने हेही सैन्यात सेवा बजावीत आहेत. संपूर्ण कुटुंब देशरक्षणार्थ सेवा बजावणारे आहे; पण या कुटुंबाकडे जमीन नाही. निवृत्त सैनिकांना शासकीय जमीन देण्याबाबतच्या कायद्यात बदल झाला आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना जमीन कशी उपलब्ध करून देता येईल, याचा अभ्यास करावा, असे निर्देश पालकमत्र्यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिले.