शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

ईदनिमित्त आज कोल्हापूर मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर नमाज पठण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 01:12 IST

मुस्लिम बांधवांची बकरी ईद आज, बुधवारी सर्वत्र साजरी होत आहे. यानिमित्त मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर सकाळी नऊ वाजता मुफ्ती इर्शाद कुन्नुरे हे पहिल्या जमातीचे नमाज व खुतबा पठण करणार आहेत.

ठळक मुद्दे मुस्लिम बोर्डिंग : हिलाल कमिटीशी चर्चेनंतर निर्णय

कोल्हापूर : मुस्लिम बांधवांची बकरी ईद आज, बुधवारी सर्वत्र साजरी होत आहे. यानिमित्त मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर सकाळी नऊ वाजता मुफ्ती इर्शाद कुन्नुरे हे पहिल्या जमातीचे नमाज व खुतबा पठण करणार आहेत.मुस्लिम बोर्डिंग येथे हिलाल कमिटीची बैठक मौलाना मस्नूर आलम कासमी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अन्य शहरांतील कमिटीच्या सदस्यांची चर्चा केल्यानंतर आज, बुधवारी बकरी ईद साजरा करण्याचा निर्णय झाला. यावेळी चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी उपस्थित होते. त्यानुसार आज शहरातील मशिदींमध्ये नमाज व खुतबा पठण होणार आहे. 

नमाजची वेळ पुढीलप्रमाणे१. कसाब मशीद : सकाळी ६ वाजून ४० मिनिटे.२. घिसाडगल्ली, वाय. पी. पोवारनगर : सकाळी ७ वाजता३. बाराइमाम, सदर बझार, बाबूजमाल, कनाननगर, बडी मस्जीद : सकाळी ७ वाजून ३० मिनिटे.४. सरनाईक वसाहत : ७ वाजून ४५ मिनिटे५. कब्रस्तान मशीद, यादवनगर, प्रगती कॉलनी, मणेर मशीद, साकोली कॉर्नर, सरदार कॉलनी, ताराबाई पार्क, सिरत मोहल्ला, प्रगती कॉलनी, मदिना कॉलनी, उचगाव, गवंडी मोहल्ला, अकबर मोहल्ला : सकाळी ८ वाजता६. टाकाळा सरदार कॉलनी, जमादार कॉलनी : सकाळी ८ वाजून १५ मिनिटे.७. घुडणपीर मस्जिद, न्यू शाहूपुरी, विचारेमाळ, शाहू कॉलनी, उत्तरेश्वर, केसापूर मस्जिद : सकाळी ८ वाजून ३० मिनिटे.८. मुस्लिम बोर्डिंग, इदगाह पहली जमात, शाहूपुरी मस्जिद, मुडशिंगी, बडी मस्जिद, राजेबागस्वार : सकाळी ९ वाजता९. नंगीवली इदगाह, मुडशिंगी : सकाळी ९.३० वाजता

 

उघड्यावर कुर्बानी नको,कोल्हापूर : शहरात आज, बुधवारी साजरी होत असलेल्या बकरी ईद सणानिमित्त कुर्बानी विधी अंतर्गत लहान जनावरे शेळी, मेंढी ही महानगरपालिकेच्या बापट कॅम्प येथे तसेच मोठी जनावरे म्हैसवर्गीय सदरबाजार कत्तलखाना येथे कुर्बानीची व्यवस्था करण्यात आली असून, सदर कत्तलखाने सोडून इतरत्र कोठेही उघड्यावर लहान अथवा मोठी जनावरांची कुर्बानीकरू नये, असे आवाहन महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.