कसबा बावडा : संपूर्ण कोल्हापूर शहराची घाण आणून टाकली जात असलेल्या कसबा बावड्यातील ‘झूम’ प्रकल्प आता भटक्या कुत्र्यांचा अड्डा झाला आहे. ‘झूम’मुळे डासांचा, माशांचा, घाणीच्या वासाचा आणि धुराचा त्रास येथील नागरिक गेली अनेक वर्षे सहन करत आहेत. आता त्यांच्या त्रासात रात्रीच्यावेळी जोरजोरात भुंकणाऱ्या, गुरगुरणाऱ्या दीड-दोनशे भटक्या कुत्र्यांच्या आवाजाची भर पडली आहे.कोल्हापूर महापालिकेला अद्याप कचरा टाकायला जागा मिळालेली नाही. त्यामुळे ‘झूम’च्या रिकाम्या जागेत कचरा टाकला जातो. पोकलँड व डोझरच्या साहाय्याने कचऱ्याचा ढीग दाबून बसवला जातो व त्यावर पुन्हा दुसरा कचरा टाकला जातो. जेव्हा कचरा टाकला जातो तेव्हा त्या ठिकाणी कुत्र्याचा कळपच आलेला असतो. खायला काय मिळेल ते तोंडात धरून कुत्री आजूबाजूच्या शेतात पसार होतात. काही कुत्री तिथेच घुटमळलेली असतात.जसजशी रात्र होईल तसतशी कुत्री एकत्र जमायला सुरुवात होते. कळपाने ते झूम व या ठिकाणच्या नागरी वस्तीभोवती फिरण्यास सुरुवात करतात. रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान कसबा बावडा-कदमवाडी या रस्त्याने एकट्याने जाण्याची सोय नाही. मोटारसायकल असली तरी कळपाने त्या मोटारसायकलस्वारावर हल्ला करतात. सध्या या रोडवरील वीज गायब आहे. त्यामुळे कुत्री नेमके कोठून हल्ला करतील हे वाहनचालकास समजत नाही. तसेच कुत्री मोठ्या संख्येने एकत्र आल्याने त्यांचे एकमेकांवर भुंकणे व गुरगुरणे सुरू होते. त्याचा प्रचंड आवाज येतो. (प्रतिनिधी )या मोकाट भटक्या कुत्र्यांचा हल्ला आता वेटाळे मळा, गायकवाड मळा, देवार्डे मळा येथील कोंबड्यांवर होऊ लागला आहे. आठवड्यापूर्वी कुत्र्यांनी आमची कोंबडी व चार पिल्ले फस्त केली तसेच कुत्री लहान वासरांवरही हल्ला करतात. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त महापालिकेने करावा.- जयवंत रघुनाथ गायकवाडगायकवाड मळा.सध्या पावसाचे दिवस असल्याने ‘झूम’मधील कचरा पाण्यामुळे कुजू लागला आहे. त्यामुळे येथे दुर्गंधी पसरली आहे. त्यातच डास, माशांची पैदास वाढली आहे. आदर्श कॉलनी ते झूम प्रकल्पाच्या रस्त्याच्या कडेने दलदल झाली आहे.- बुरहान नायकवडीसचिव, प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्था. झूम प्रकल्पावर किमान दीड-दोनशे कुत्री आहेत. रात्रीच्यावेळी ते प्रचंड ओरडतात-भुंकतात. त्यांना हुसकावून लावायचे म्हटले तर ते उलट अंगावर धावून येतात. त्यामुळे जीव मुठीत घेऊनच आमचा मळ््यात वावर असतो.-भगवान वेटाळेवेटाळे मळा
‘झूम’ झालाय भटक्या कुत्र्यांचा अड्डा
By admin | Updated: July 21, 2014 23:59 IST