शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टींच्या चुकांमुळेच माझा विजय : धैर्यशील माने, कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 11:38 IST

राजू शेट्टी यांनी चुका केल्यामुळेच माझा विजय झाला, अशी कबुली नूतन खासदार धैर्यशील माने यांनी दिली. त्यांच्या चुकांमुळेच मी खासदार झालो असलो तरी पुढील पाच वर्षांनंतर माझ्या कामाच्या जिवावरच मी खासदार म्हणून पुन्हा विजयी होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माध्यमांनी पाठीशी उभे राहावे, मित्रत्वाच्या नात्याने चुका दाखवून द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

ठळक मुद्देराजू शेट्टींच्या चुकांमुळेच माझा विजय : धैर्यशील मानेकोल्हापूर प्रेस क्लबतर्फे सत्कार

कोल्हापूर : राजू शेट्टी यांनी चुका केल्यामुळेच माझा विजय झाला, अशी कबुली नूतन खासदार धैर्यशील माने यांनी दिली. त्यांच्या चुकांमुळेच मी खासदार झालो असलो तरी पुढील पाच वर्षांनंतर माझ्या कामाच्या जिवावरच मी खासदार म्हणून पुन्हा विजयी होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माध्यमांनी पाठीशी उभे राहावे, मित्रत्वाच्या नात्याने चुका दाखवून द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे मंगळवारी नूतन खासदार धैर्यशील माने यांचा फेटा बांधून व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार माने यांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे देताना राजकीय वाटचालही विशद केली. ते म्हणाले, स्व. खासदार बाळासाहेब माने यांच्याप्रमाणेच नैतिकतेचे व्रत घेऊन राजकारणात आलो, ते आयुष्यभर जपणार आहे. याच जिवावर मी ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंत राजकीय प्रवास केला आहे.

नकारात्मक वातावरण असतानाही, आर्थिक बळ नसतानाही, शंका-कुशंकांच्या वातावरणातही बहुजनांच्या जिवावर संसदेत पाय ठेवण्याची संधी मला मिळाली. राजकारण पाच वर्षांनंतर करणार. आता समाजकारणाचा अध्याय सुरू झाला आहे. सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच शाहूंच्या या जिल्ह्याचा लौकिक वाढविण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. पुढील दोन वर्षे मतदारसंघावर लक्ष केंद्रित करणार आहे. मागील खासदारांनी सुरू केलेली कोणतीही कामे बंद करणार नाही, आकसाने कधी वागणार नाही. जुन्या-नव्यांचा मेळ घालतच माझी वाटचाल सुरू राहील. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष समीर मुजावर, सचिव बाळासाहेब पाटील, विजय पोवार उपस्थित होते.‘संसदरत्न’ दिलं तरी नको!‘संसदरत्न’ पुरस्काराविषयी छेडले असता खासदार माने यांनी ‘संसदरत्न दिलं तरी नको रे बाबा...’ असे म्हणत जनतेचे प्रश्न सोडविणे हाच माझा पुरस्कार असल्याचे स्पष्ट केले. स्पर्धेत धावण्याची माझी इच्छा नाही; याउलट लोकांना न्याय देणे हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर