शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

माझ्या नियमाने काम चालेल, तुम्हाला पाहुणे म्हणून बोलविलेले नाही....

By admin | Updated: June 30, 2015 00:27 IST

--जिल्हाधिकारी कार्यकर्त्यांवर भडकले

कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे म्हणणे अगोदर शांतपणे जाणून घेणे, हे खरे तर जिल्हाधिकाऱ्यांचे काम असते. परंतु, सोमवारी कोल्हापूरकरांना याच्या उलटा अनुभव तर आलाच, शिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वभावाचेही दर्शन झाले. हद्दवाढ होण्यासाठी निवेदन द्यायला गेलेल्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना उद्देशून जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी, ‘इथे माझ्या नियमाप्रमाणे काम चालेल, मी काही तुम्हाला पाहुणे म्हणून बोलविलेले नाही’, अशा शब्दांत कानउघाडणी केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरच्या सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते चकित झाले. सोमवारी कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी डॉ अमित सैनी यांना भेटण्यासाठी पूर्व परवानगीने गेले होते. भेटीची वेळ सकाळी दहा वाजताची दिली होती. प्रत्यक्षात जिल्हाधिकारी अकरा वाजता कार्यालयात आले. दरम्यानच्या काळात कार्यकर्त्यांची संख्या दीडशेच्या आसपास असल्याचे पाहून ताराराणी सभागृहात बसण्याचा सल्ला काही कर्मचाऱ्यांनी दिला. त्यानुसार कार्यकर्ते ताराराणी सभागृहात बसले. तोपर्यंत सकाळी अकराची वेळ दिल्याप्रमाणे हद्दवाढ विरोधी कृती समितीचे आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात पोहोचले. त्यांच्याशी पंधरा ते वीस मिनिटांत चर्चा झाली. सर्व कार्यकर्ते कार्यालयातून बाहेर पडले. त्याचवेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत असणारे भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, राष्ट्रवादीचे आर. के. पोवार, बाबा पार्टे जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात गेले. त्यांनी कार्यकर्त्यांची संख्या अधिक असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना सभागृहात येण्याची विनंती केली. त्यावेळी डॉ. सैनी यांनी त्यास ठाम नकार दिला. सर्वच कार्यकर्त्यांना येथे बसता येणे अशक्य आहे, असे आर. के. पोवार म्हणताच जिल्हाधिकारी डॉ. सैनी भडकले. ‘इथे मी नियम केलेत. माझ्या नियमाप्रमाणे काम चालेल, मी काही तुम्हाला पाहुणे म्हणून बोलविलेले नाही. तुम्ही मला भेटायला आला आहात. लोक जास्त असतील, तर बाहेर थांबतील. मी काही सर्वांना बसायला खुर्ची देऊ शकत नाही’, अशा शब्दांत त्यांनी खडसावले. त्यामुळे काहीसे नाराज होऊन आर. के. पोवार कार्यकर्त्यांना बोलावतो म्हणून कक्षातून बाहेर पडले. नेमक्या याचवेळी तेथे उपस्थित असलेले बाबा पार्टे जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले, साहेब बऱ्याचवेळा आम्ही ताराराणी सभागृहात बसलो. तेथे जिल्हाधिकारी यायचे, चर्चा करायचे. त्यामुळे तुम्ही यायला काहीच हरकत नव्हती’. बाबांचे हे बोलणे ऐकून जिल्हाधिकारी आणखी भडकले. ते म्हणाले, हे कलेक्टर आॅफिस आहे. कलेक्टरांसमोर बसला आहात. मोठ्या आवाजाने बोलण्याचे काहीच कारण नाही, आधी खाली आवाजात बोला’, असे जिल्हाधिकारी म्हणाले. शेवटी बाबा पार्टेही संतप्त झाले. ते म्हणाले, शहरात एखादी घटना घडली की जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आम्हाला गाड्या घेऊन घरे शोधत बोलवायला येतात, आम्हीही येतो. प्रशासनाला मदत करतो. त्यामुळेच सभागृहात येऊन आमचे म्हणणे ऐकावे असा आमचा आग्रह होता, त्यात काय चुकले’. तेव्हा डॉ. सैनी यांनी महेश जाधव यांच्याकडे बघत ‘जाधव यांना जरा समजावा’ असे सांगितले. तणावाच्या वातावरणात बैठक सुरू झाली. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी समंजसपणा दाखवत मला माफ करणार की नाही, अशी विचारणा कार्यकर्त्यांकडे करीत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांच्या बोलण्यावर कार्यकर्ते नाराजी व्यक्त करताना दिसले. (प्रतिनिधी)