शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

माझी निवडणूक तरुणांच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 00:17 IST

सेनापती कापशी : युवक हा प्रत्येक निवडणुकीच्या केंद्रस्थानी असतो. युवक जर पेटून उठला तर तो काय करू शकतो, हे ...

सेनापती कापशी : युवक हा प्रत्येक निवडणुकीच्या केंद्रस्थानी असतो. युवक जर पेटून उठला तर तो काय करू शकतो, हे मी अनेक निवडणुकीत अगदी जवळून पाहिले आहे. निवडणुकीच्या निकालांचे परिणाम तो बदलू शकतो. आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी तरूण सज्ज झाले असून, कागल विधानसभा मतदारसंघातील तरुणांनीच माझी निवडणूक हातात घेतली आहे, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.सेनापती कापशी (ता. कागल) येथे आयोजित ‘साद तरुणाईची....संवाद युवकांशी’ या सेनापती कापशी जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यक्रमात मुश्रीफ बोलत होते.नोटाबंदी, जीएसटी सारख्याच्या चुकीच्या निर्णयामुळे देशात मोठ्या प्रमाणात तरुण बेरोजगार झाले ही वस्तुस्थिती आहे. देशातील कोणताही घटक सरकारच्या कामावर समाधानी नाही. खोटी-नाटी स्वप्ने दाखवून जनतेला फसविण्याचे काम भाजप-शिवसेनेच्या सरकारकडून सुरू आहे. शिवसेनेने मोर्चे काढत बसण्यापेक्षा राजीनामे देऊन सरकारमधून बाहेर पडायचे धाडस दाखवले पाहिजे. महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावर आता जनतेने आक्रमक झाले पाहिजे, असेही आमदार मुश्रीफ यावेळी म्हणाले.माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत यावेळी म्हणाले, आमदार मुश्रीफ यांच्यामुळे नागणवाडी प्रकल्पाचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण करून येत्या पावसाळ्यात पाणी साठविण्याचे कामही तेच पूर्ण करतील, यावर जनतेचा विश्वास आहे. चिकोत्रा प्रकल्पात सर्वांत जास्त पाणी हे म्हातारीचे पठारावरून येत आहे. हे कामही आमदार मुश्रीफ यांनीच पूर्ण केले आहे. आपापसातील मतभेद विसरून मुश्रीफ यांना ताकद देऊन सर्वांनी एकत्र येऊन येणारी विधानसभेची निवडणूक लढूया.सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, तमनाकवाडचे सरपंच दत्तात्रय चव्हाण, तालुका संघाचे अध्यक्ष सूर्याजी घोरपडे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शामराव पाटील, विजय सातवेकर आदींनी मनोगत व्यक्त केले. स्वागत प्रवीण नाईकवाडे यांनी, तर प्रास्ताविक सूर्यकांत भोसले यांनी केले.यावेळी कार्यक्रमास भय्या माने, युवराज पाटील, पंचायत समिती सदस्य दीपक सोनार, जे. डी. मुसळे, नेताजी मोरे, अंकुश पाटील, मधुकर नाईक, बळवंत तिप्पे, सागर पाटील, बाबूराव अस्वले, बाळासाहेब खतकल्ले, आदीसह सेनापती कापशी जिल्हा परिषद मतदारसंघातील तरुण व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.