शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘वारणे’च्या निधीसाठी माझेही योगदान : राजू शेट्टी-काही मंडळींकडून माझी बदनामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 01:05 IST

इचलकरंजी : शहरासाठी आवश्यक असलेल्या वारणा नळ योजनेसाठी केंद्राच्या अमृत योजनेतून निधी आणण्यामध्ये आपले योगदान आहे. मात्र, काही मंडळी स्वत:चा उदो-उदो करीत माझी बदनामी करीत आहेत.

इचलकरंजी : शहरासाठी आवश्यक असलेल्या वारणा नळ योजनेसाठी केंद्राच्या अमृत योजनेतून निधी आणण्यामध्ये आपले योगदान आहे. मात्र, काही मंडळी स्वत:चा उदो-उदो करीत माझी बदनामी करीत आहेत. या योजनेला माझा विरोध नाही. दानोळीकरांच्या मनातील शंका दूर करण्याची गरज आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करीत असून, आपल्याला नक्कीच यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करीत असताना खासदार राजू शेट्टी यांनी आमदार सुरेश हाळवणकर यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला.

खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून शहरातील २७ शाळांना संगणक प्रदान आणि विविध अशा ९६ ठिकाणी कूपनलिका खुदाई प्रारंभाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात खासदार शेट्टी बोलत होते.गेल्या चार वर्षांपासून इचलकरंजीसाठी वारणा नदीतून पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. मात्र, वारणाकाठच्या ग्रामस्थांचा या योजनेला विरोध आहे. त्या विरोधामागच्या अडचणी समजावून घेणे गरजेचे आहे; पण वारणा नदीतील पाणी वाटपाबाबत असलेली वस्तुस्थिती पाटबंधारे खात्याने जनतेसमोर स्पष्ट केली पाहिजे. ज्यातून गैरसमज दूर होतील, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अ‍ॅड. सुरेश पाटील यांनी स्वागत, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष विजय भोसले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कॉँग्रेसचे नगरपालिकेतील पक्षप्रतोद सुनील पाटील, नगरसेवक शशांक बावचकर, राजू बोंद्रे, माजी जि. प. सदस्य जयकुमार कोले, गोवर्धन दबडे, अलका खोचरे, शिवाजी माने, आदींनी आपले विचार मांडले.कार्यक्रमासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्षभगवान काटे, जि. प. महिला व बालकल्याण सभापती शुभांगीशिंदे, सावकार मादनाईक, युवक कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष अमृत भोसले, आप्पा बेडगे, राजाराम देसाई, नितीन कोकणे, आदींसह नागरिक उपस्थित होते.शेतकºयांनासुद्धा आरक्षण द्यावेकार्यक्रम संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार शेट्टी यांनी शरद पवार यांच्या एका मुलाखतीतील आर्थिक निकषावर आरक्षण याचा धागा पकडला व ते पुढे म्हणाले, बहुसंख्य शेतकरी सर्वसामान्य आहेत. त्यामुळे शेतकºयांनासुद्धा आर्थिक निकषावर आरक्षण देणे, ही आता काळाची गरज आहे.

यंत्रमाग उद्योग वाºयावरकेंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, तर राज्य सरकारनेसुद्धा वस्त्रोद्योग धोरण जाहीर करताना यंत्रमाग उद्योगाला वाºयावर सोडले आहे. वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी यंत्रमाग उद्योगाला वीजदराची सवलत व कर्जावरील व्याजदरात सूट देण्याची दिलेली ग्वाहीसुद्धा आता पोकळ ठरली आहे, अशीही टीका खासदार शेट्टी यांनी यावेळी केली.