शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

कोल्हापुरात पूरग्रस्तांना वाटप झालेल्या २७ टक्के भूखंडांची परस्पर विक्री

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: July 25, 2022 14:13 IST

कोल्हापुरात पूरपुनर्वसन झालेली करवीर तालुक्यातील चिखली आणि वळिवडे ही दोन गावे आहेत. या पुनर्वसित नागरिकांना वाटप झालेल्या भूखंडाची सद्यस्थिती लोकमतने जाणून घेतली.

इंदुमती गणेशकोल्हापूर : करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली व वळिवडे येथील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी शासनाने वाटप केलेल्या भूखंडापैकी २७ टक्के भूखंडाची परस्पर विक्री झाल्याचे जिल्हा प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात निदर्शनास आले. ज्या नागरिकांना पूर्वी भूखंड मिळाला आहे, त्यांनीदेखील पुन्हा अर्ज केले आहेत, अशा नागरिकांना वगळून १९८९ सालची यादी ग्राह्य धरत ज्यांना खरेच अजून भूखंड मिळालेला नाही त्यांनाच नव्याने भूखंड वाटप केले जाणार आहे.कोल्हापुरात पूरपुनर्वसन झालेली करवीर तालुक्यातील चिखली आणि वळिवडे ही दोन गावे आहेत. या पुनर्वसित नागरिकांना वाटप झालेल्या भूखंडाची सद्यस्थिती लोकमतने जाणून घेतली.दर दहा वर्षांनी ग्रामपंचायतीमध्ये वाढलेल्या लोकसंख्येच्या आधारावर ग्रामपंचायतींनी ठराव करून गावठाण वाढ करणे गरजेचे आहे. पण, असे होत नाही. त्यामुळे गावठाण सोडून बाह्य परिसरात राहणाऱ्यांची संख्या मोठी असून ही घरे अतिक्रमणात येतात. याकडेही शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.घर टू घर केले सर्वेक्षणशासनाने कायम पूरबाधित असलेल्या प्रयाग चिखली ग्रामस्थांना १९८९ साली पुनर्वसनासाठी भूखंड दिले. त्यावेळी सोनतळी येथे १३०० भूखंड पाडण्यात आले. त्यापैकी ८६४ भूखंड पूरग्रस्तांना देण्यात आले. त्यापैकी २२९ भूखंडाची परस्पर विक्री झाली. ११ भूखंडावर अतिक्रमण झाले.वळिवडे येथील पूरग्रस्तांना १८३ भूखंडाचे वाटप झाले. त्यापैकी ४९ भूखंडांची परस्पर विक्री झाली. एकदा भूखंड मिळाल्यावर अनेक नागरिकांनी पुन्हा जिल्हा प्रशासनाकडे मागणी अर्ज केले. त्यामुळे प्रशासनाच्यावतीने पूरपुनर्वसित गावांचे घर टू घर सर्वेक्षण करण्यात येत आहे.

प्रयाग चिखलीची २०१९ सालच्या पुरानंतरची स्थिती

पडझड प्रकार : संख्या : भूखंड मिळालेले : भूखंड न मिळालेले : भूखंडाची विक्री केलेले : बांधकाम केलेेले : बांधकाम न केलेलेपूर्णत: पडझड : १६० : १५८ : २ : १० : ४४ : १०१ (तीन व्यक्तिींना दुबार मिळकत)अंशत: पडझड : २६१ : २४१ : २० : २२ : ६० : १५९मूळ जमीन शासनाला देणे बंधनकारक..पुनर्वसनात दुसरा भूखंड मिळाल्यावर आधीची जागा शासनाच्या नावे करणे अपेक्षित आहे. पण मूळ घर देखील सोडायचे नाही आणि नवीन भूखंडही हवा, असा सध्या व्यवहार सुरू आहे. वर्षभर ते मूळ घरी राहतात आणि पुराच्या काळात तेवढे सोनतळीत जाऊन राहतात. सध्या आरे (ता.करवीर) गावच्या पुनर्वसनाचा विषय सुरू असताना पूर्वानुभव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आधीच घराची मूळ जागा शासनाला देण्याची अट घातली आहे, पण त्याला आरे ग्रामस्थ तयार नाहीत.

वारसांकडूनही मागणी...

एका कुटुंबाला एक भूखंड यानुसार पूर्वी प्लॉटचे वाटप झाले आहे. पण, आता त्या कुटुंबातील वारसांनी भूखंडाची मागणी केली. वडिलांना भूखंड मिळाला होता, आम्ही तीन भाऊ असताना एकाच्याच हक्कात भूखंड जाणार असल्याने उरलेल्या दोघांनी काय करायचं, पूर्वी मिळालेल्या भूखंडाची विक्री केली आहे, आता नवीन भूखंड द्या, अशी मागणी केली जात आहे.

सगळी प्रकरणे निकाली काढणार..भूखंड न मिळालेल्या चिखलीतील कुटुंबातील दोन-तीन व्यक्तींनी, तर भूखंड मिळालेल्या कुटुंबातील मुले, मुली, सुनांच्या नावे मागणी अर्ज आल्याचे सर्वेक्षणादरम्यान प्रशासनाच्या लक्षात आले. ज्या कुटुंबांना पूर्वी जमीन मिळाली आहे, त्या कुटुंबांचे अर्ज निकाली काढून जे खरेच पात्र आहेत पण, भूखंड मिळालेला नाही, अशा नागरिकांना ते दिले जाणार आहेत. त्यासाठी १९८९ सालची यादी ग्राह्य धरली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKolhapur Floodकोल्हापूर पूर